नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नाशिक दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री झाल्यापासून गेल्या सहा महिन्यात त्यांनी सहा ते सात वेळा नाशिक दौरा केला आहे. आताही ते नाशिक भेटीवर येत आहेत. दिंडोरीच्या स्वामी समर्थ सेवा मार्गाच्यावतीने आयोजित बाराव्या जागतिक कृषी महोत्सवाला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे नाशिकला येत आहेत. मुंबईहून शासकीय विमानाने ते ओझर विमानतळावर येणार आहेत. त्यानंतर ते गंगापूररोडवरील डोंगरे वसतीगृह मैदानाच्या ठिकाणी आयोजित कृषी महोत्सवाला ते भेट देणार आहेत. त्यानंतर ते विमानाने औरंगाबादकडे जाणार आहेत.
औरंगाबाद, पुणे दौरा
मुख्यमंत्री हे औऱंगाबाद येथील श्री संत निराकारी समागर कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्यानंतर ते पुण्याला जातील. तेथे देहू येथील संत तुकाराम महाराज मंदिर व माघ दशमी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तसेच, भोसरीतील इंद्रायणी थडी या जत्रेला ते भेट देतील. त्यानंतर शिंदे हे मुंबईत येतील. तेथे सायंकाळी ते मालाड येथे खासदार निधीतून बांधलेल्या योगालयाचे उदघाटन करणार आहेत.
Chief Minister Eknath Shinde Nashik Tour Today