नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकमध्ये असून त्यांच्या उपस्थितीत दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्रीबरोबरच आज वेगवेगळ्या खात्याचे मंत्रीसुध्दा असणार आहे. नाशिकमध्ये मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे सिंहस्था कुभमेळा २०२७ पूर्वतयारी बैठक संपन्न होणार आहे. त्यानंतर विविध शासकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचनंतर ३.१५ वाजता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’ चे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा होणार आहे. सायं ५ वाजता चित्पावन ब्राह्मण संघाच्या परशुराम भवन या भव्य वास्तूचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या दोन मुख्य कार्यक्रमांबरोबरच विविध कार्यक्रम असे असणार आहे.
