इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील नवा रायपूर येथे २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या काँग्रेसच्या ८५व्या राष्ट्रीय अधिवेशनापूर्वीच मोठी खळबळ उडाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राज्यातील १२ हून अधिक काँग्रेस नेत्यांच्या घरांवर छापे टाकले आहेत. ईडीचे पथक पहाटे पाच वाजल्यापासून रायपूरमधील अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांच्या घरे आणि कार्यालयात पोहोचले आहे. कागदपत्रांची छाननी करत आहे. तपास करत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे.
https://twitter.com/INCIndia/status/1627564961999486976?s=20
ईडीने टाकलेल्या छाप्यांमध्ये छत्तीसगडचे राज्यमंत्री सनी अग्रवाल यांच्या टिकरापारा येथील निवासस्थानावर कारवाई सुरू आहे, तर काँग्रेस नेते विनोद तिवारी यांच्या निवासस्थानावर, मोवा आणि दडसेना यांच्या अवंती विहार येथील निवासस्थानावर छापे टाकण्यात येत आहेत. याशिवाय काँग्रेस नेते आरपी सिंह, भिलाईचे आमदार देवेंद्र यादव यांच्या दोन्ही घरांवर ईडीने छापे टाकले आहेत. ईडीने आमदारांच्या सेक्टर-5मधील घर आणि गृहनिर्माण मंडळावर छापे टाकले आहेत. ईडीचे पथकही गिरीश यांच्या घरीही पोहोचले आहेत. येत्या काही दिवसांत छत्तीसगडमध्ये काँग्रेस पक्षाचे महाअधिवेशन होणार आहे. याआधी राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या घरांवर ईडीचे मोठ्या प्रमाणावर छापे पडल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनापूर्वी राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या घरांवर ईडीने टाकलेल्या मोठ्या प्रमाणावर छापेमारीमुळे ही कारवाई राजकीय सूडापोटी होत असल्याची टीका होत आहे.
https://twitter.com/INCIndia/status/1627574809839419392?s=20
भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचे याआधीही छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी म्हटले आहे. असे करून आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न होत आहे. पण आम्ही घाबरत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या वर्षात पहिल्यांदाच ईडीने थेट काँग्रेस नेत्यांच्या घरावर छापा टाकला आहे. राज्यात कोळसा वसुलीप्रकरणी सातत्याने कारवाई सुरू होती, ज्यात अनेक आयएएस आणि कोळशाशी संबंधित व्यापारी ईडीच्या कोठडीत आहेत. काँग्रेस नेत्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर छापे पडल्याने कोळशाच्या प्रकरणाकडे कुठेतरी बोट दाखवले जात आहे.
https://twitter.com/INCIndia/status/1627568233237676033?s=20
Chhatisgarh Congress MLA Enforcement Directorate Raid