मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगचा वाढता प्रभाव पाहता शासनाने काय उपाययोजना केली यावर लेखी उत्तरात सरकारने निवडक भागातील डास पकडुन त्याचे वर्गीकरण केले, विच्छेदन केले, व डास घनता काढली असे उत्तर दिले होते यावर प्रश्न विचारताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी एकूण किती डास पकडले, डासांचे वर्गीकरण करताना किती नर आणि किती मादी डास आढळले. यात नर डास जास्त धोकादायक आहे की मादी डास धोकादायक आहे. डासांच्या विच्छेदनाचे अहवाल प्राप्त झाले आहेत का..? याचा व्हीसेरा उपलब्ध आहे का .? असे गमतीशीर प्रश्न विचारले… (बघा हा व्हिडिओ)
पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाचा प्रभाव वाढत आहे. याबाबत राज्य शासनाने काय उपाययोजना केली अशी विचारणा विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार यांनी सरकारला केली होती. #MonsoonSession2022 #पावसाळीअधिवेशन२०२२ pic.twitter.com/aBdAs7PxaZ
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) August 22, 2022
Chhagan Bhujbal on Misquito Question Video