नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला मतदारसंघात अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्रविकास योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या ३ कोटी ७६ लक्षच्या विविध विकास कामांची स्थगिती उठविण्यात आली आहे. यामध्ये रस्ते काँक्रिटीकरण, शादिखाना हॉल, कब्रस्थान अनुषंगिक विकास कामे, कब्रस्थान संरक्षण भिंत, भूमिगत गटार यासह विविध विकास कामांचा समावेश आहे. या कामांना लवकरच सुरुवात होणार असून अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहे.
येवला मतदारसंघात येवला तालुक्यातील सायगाव येथे शादीखाना बांधण्यासाठी १५ रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच विखरणी येथे शादीखाना बांधण्यासाठी १० लक्ष, अंदरसूल येथे बल्लासपुरा येथे रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी १० लक्ष, अंदरसूल येथे शादिखाना बांधण्यासाठी १५ लक्ष, उंदीरवाडी येथे कब्रस्तानास संरक्षक भिंत व काँक्रिटीकरण करण्यासाठी १५ लक्ष, नांदेसर येथे कब्रस्तान रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी १० लक्ष, पाटोदा येथे न्याहारखेडा येथे कब्रस्तान रस्ता काँक्रिटीकरण व अंतर्गत सुविधा निर्माण करण्यासाठी १५ लक्ष, रेंडाळे न्याहारखेडा कब्रस्तान रस्ता काँक्रिटीकरण व अंतर्गत सुविधा निर्माण करण्यासाठी १५ लक्ष, तळवाडे कौटखेडे येथे शादीखाना बांधण्यासाठी १० लक्ष, तळवाडे कौटखेडे येथे गावअंतर्गत रस्ता कॉक्रिटीकरण करण्यासाठी १० लक्ष, तळवाडे कौटखेडे येथे पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी १० लक्ष, निमगाव मढ येथे कब्रस्तानास संरक्षक भिंत व अंतर्गत काँक्रिटीकरण करण्यासाठी १५ लक्ष निधी मंजूर करण्यात आलेली होती.
तसेच रहाडी येथील कब्रस्तानास संरक्षक भिंत व काँक्रिटीकरण व अंतर्गत सुविधा करण्यासाठी १० लक्ष, पारेगाव येथे कब्रस्तान काँक्रिटीकरण व अंतर्गत सुविधा करण्यासाठी १५ लक्ष, पिंपरी कब्रस्तानात काँक्रिटीकरण व अंतर्गत सुविधा करण्यासाठी १० लक्ष, चिंचोडी खु. कब्रस्तानात संरक्षक भिंत व पाणी पुरवठा करण्यासाठी १० लक्ष, एरंडगाव बु. येथे कब्रस्तान संरक्षक भिंत व अंतर्गत सुविधा करण्यासाठी १० लक्ष, कोटमगाव देविचे गावात कब्रस्तान संरक्षक भिंत व अंतर्गत सुविधा करण्यासाठी १० लक्ष, भारम येथे शादिखाना बांधण्यासाठी १० लक्ष, आडगाव चोथवा येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी १० लक्ष, अनकाई येथे कब्रस्तान संरक्षक भिंत व अंतर्गत सुविधा करण्यासाठी १० लक्ष, सोमठाण देश येथे शादीखाना बांधकाम करण्यासाठी १० लक्ष, जळगाव नेऊर येथे कब्रस्तान जोडरस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी १० लक्ष, नगरसूल येथे शादिखाना बांधकाम करण्यासाठी १५ लक्ष रुपये निधीस मंजुरी मिळालेली होती.
त्याचबरोबर निफाड तालुक्यातील मौजे पिंपळगाव नजिक रजानगर व श्रीरामनगर येथे अंतर्गत रस्ता कांक्रिटीकरण व अनुषंगीक व भूमिगत गटार करण्यासाठी २० लक्ष, विंचूर येथील मोमिनपुरा इस्लामपुरा येथे रस्ता काँक्रिटीकरण व अनुषंगीक व भूमिगत गटार करण्यासाठी १० लक्ष, विंचूर इदगाह संरक्षक भिंत व अनुषंगिक कामे करण्यासाठी ७ लक्ष, चौक सोनापूर कब्रस्तानात संरक्षक भिंत व अनुषंगिक कामे करण्यासाठी १० लक्ष, लासलगाव येथे कब्रस्तानात संरक्षक भिंत व अनुषंगिक कामे करण्यासाठी १४ लक्ष, रूई अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी १० लक्ष, देवगाव कब्रस्तानात संरक्षक भिंत बांधणे व पेव्हरब्लॉक बसविण्यासाठी व देवगाव येथील गाव रस्ता ते इसाक भाई घरापर्यंत काँक्रिटीकरण करण्यासाठी प्रत्येकी १० लक्ष, सुभाषनगर येथील इदगाहास संरक्षक भिंत व अनुषंगिक कामे करण्यासाठी ५ लक्ष रुपये असा एकूण ३ कोटी ७६ लक्ष निधी मंजूर करण्यात आलेला होता. या कामांना गेल्या काळात स्थगिती देण्यात आलेली होती. आता राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून स्थगिती उठविण्यात आली असून लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे.
chhagan bhujbal constituency yeola development work politics ncp minister nashik