नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच मंत्री छगन भुजबळ हे गुरुवार दि.२२ मे २०२५ रोजी नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचे नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे,जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार,जिल्हाध्यक्ष विष्णूपंत म्हैसधुणे यांनी केले आहे.
मंत्री छगन भुजबळ हे सकाळी ११ वाजता इगतपुरी येथील हॉटेल ग्रीन लॅन्ड समोरील हायवे येथे येणार आहे. याठिकाणी त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात येईल. त्यानंतर दुपारी १२ वाजता राष्ट्रवादी भवन मुंबई नाका येथे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येईल त्यानंतर ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. त्यानंतर ३.३० वाजता ते येवल्याकडे प्रयाण करतील. त्यानंतर ४.३० वाजता विंचूर ता.निफाड येथे तर ५ वाजता येवला संपर्क कार्यालय येवला येथे त्यांचे आगमन होणार आहे. याठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार, जिल्हाध्यक्ष विष्णूपंत म्हैसधुणे यांनी केले आहे.