इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तब्बल ७० वर्षानंतर पुन्हा एकदा भारत भूमीत चित्ते दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आझ वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या हस्ते ८ चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले. आफ्रिका खंडातील नामिबिया येथून ८५०० किमीवरून हे चित्ते आणण्यात आले. या आठ चित्त्यांसाठी कुनो राष्ट्रीय उद्यानात विशेष क्षेत्र तयार करण्यात आले आहे.
नामिबियावरून आठ चित्ते घेऊन विशेष मालवाहू विमान मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथे दाखल झाले. त्यानंतर हे आठ चित्ते ग्वाल्हेरहून भारतीय हवाई दलाच्या चिनूक हेलिकॉप्टरने मध्य प्रदेशातील श्यापूर जिल्ह्यातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आले. चित्त्यांना शिकार करता येतील अशी काळविट आणि रानडुक्कर या नॅशनल पार्कमध्ये मोठ्या संख्येने आहेत.
https://twitter.com/PANDITMUSTAFA/status/1571052741174382592?s=20&t=NtH35UeJRhs88civ9-j-xw
असा आहे इतिहास
१९७० मध्ये इंदिरा गांधींनी इराणहून भारतात चित्ते आणण्याची तयारी सुरु केली होती. इराणच्या शाहांशी इंदिरा गांधी यांनी करारावर सह्याही केल्या होत्या. त्या काळी इराणमध्ये 300 चित्ते होते. पण त्याचवेळी इराणच्या शाहची सत्ता बदवण्यात आली आणि ही बोलणी बारगळली. त्यांचीशिकार, कमी होणारे अधिवास आणि काळवीटं, सांबर आणि ससे यांची संख्या रोडावल्यामध्ये दुर्मिळ झालेलं भक्ष्य या सगळ्या कारणांमुळे चित्ता भारतातून नामशेष झाला.
आणखी चित्ते येणार
भारतात आल्यानंतर या चित्त्यांची वाढ कशी होते हे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. जगात एकूण सात हजारच्या आसपास चित्ते आहेत. त्यापैकी तब्बल दोन तृतीयांश चित्ते हे एकट्या दक्षिण आफ्रिकेतच आढळतात. एकूण १६ चित्ते भारतात आणायचे आहेत, त्यापैकी ८ चित्ते यांची ही पहिली बॅच पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसांच्या दिवशी भारतात दाखल झाले आहेत.
जगातल्या एकूण ७ हजार चित्त्यांपैकी बहुतेक दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि बोट्स्वानात आढळतात. भारतामध्ये १९०० सालापासून पुढे चित्त्यांची संख्या कमी होऊ लागली आणि चित्ता दिसल्याची शेवटची नोंद १९६७-६८ मध्ये झाली होती. कारण चित्त्यांनी गावांमध्ये शिरुन पाळलेली जनावरे मारायला सुरुवात केल्याने ब्रिटीशांच्या काळामध्ये तर बक्षीस लावून चित्त्यांची शिकार करण्यात आली. संवर्धनासाठी एक मोठ्या मांसाहारी प्राण्याचं एका खंडातून दुसऱ्या खंडात स्थलांतर करण्यात येण्याची ही पहिली घटना आहे.
https://twitter.com/narendramodi/status/1571020042346831872?s=20&t=NtH35UeJRhs88civ9-j-xw
भारतात आणलेले चित्ते असे
आता नामिबियातून भारतात आणल्या जाणाऱ्या आठ चित्त्यांमध्ये पाच मादी व तीन नर आहेत. त्यापैकी पाच मादी चित्त्यांचे वय दोन ते पाच वर्षे दरम्यान तर तीन नर चित्त्यांचे वय ४.५ ते ५.५ वर्षे दरम्यान आहे, अशी माहिती चित्ता कॉन्झर्व्हेशन फंड (सीसीएफ) या स्वयंसेवी संस्थेने दिली. सलग २० तासांत ८ हजार किलोमीटरचे अंतर कापून चित्ते भारतात पोहोचले आहेत. नामिबियाच्या चित्ता संवर्धन विभागाचे (CCF) एक पथक चित्त्यांसोबत आहे. कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. कुनो नॅशनल पार्क हे ७४८ चौरस किलोमीटरवर पसरलेलं संरक्षित क्षेत्र आहे. या पार्कमध्ये चित्त्यांसाठी १२ किमी लांब कुंपण उभारण्यात आले आहे.
चित्त्याची वैशिष्ट्ये
अंगावर काठे ठिपके असणारा सडपातळ बांध्याचा चित्ता भक्ष्य पकडण्यासाठी माळरानावर ताशी ११२ किलोमीटर्स पर्यंतच्या वेगाने सुसाट धावू शकतो. चपळ शरीरयष्टीच्या चित्त्याचे वैशिष्ट्यं म्हणजे शिकारीसाठी हल्ला करताना तो सुसाट पळतो, पण अचानक थांबू शकतो, दबा धरून नंतर झेप घेतो.
Cheetah Came in India After 70 Years
PM Narendra Modi