चांदवड – मुंबई आग्रा रोड वरील चांदवड नजीक आहेर वस्ती समोर डोंगराच्या पायथ्याला चिंचेच्या झाडाजवळ शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास सुमारे ३५ ते ४० वर्षीय वयाच्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या व्यक्तीचा चेहरा कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. मृताच्या जवळच थोड्या अंतरावर कीटकनाशकाची एक बाटली पडलेली आढळून आली याबाबतची खबर डोंगर मनाजी गोधडे रा. रेणुका देवी मंदिर जवळ चांदवड यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिली चांदवड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव हे करीत आहेत.