डांगसौंदाणे– डांगसौंदाणे विज उपकेंद्रातील प्रशिक्षणार्थी विज कर्मचारी राजकुमार गांगुर्डे (२१) च्या मृत्युस जबाबदार अधिकारी कर्मचारीवर तात्काळ कार्यवाही करा व त्याच्या कुटुंबियांना ५० लाखांची भरपाई द्या अन्यथा येत्या १० फेब्रुवारी पासुन आमरण उपोषण करण्याचा इशारा डांगसौंदाणे ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे- पाटील यांना देण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रती उपविभागीय प्रांत अधिकारी, पोलीस निरीक्षक, विजवीतरणचे कार्यकारी अभियंता, आमदार दिलीप बोरसे, माजी आमदार दिपीका चव्हाण यांना देण्यात आल्या आहेत.
२६ फेब्रुवारी रोजी डांगसौंदाणेचा रहिवाशी असलेल्या राजकुमार गांगुर्डे या प्रशिक्षणार्थी कर्मचारीला वीज उपकेंद्रातील वरिष्ठ तंत्रज्ञ संतोष शिरसाठ यांनी दगडी साकोडे येथील रोहित्रवर बेजबाबदार पणे कामाला पाठविले यावेळी राजकुमार बरोबर कोणी ही अनुभवी कर्मचारी गेला नसल्याने या वेळी ड्युटी वर असलेल्या ऑपरेटरने विद्युत पुरवठा खंडीत न केल्याने राज चा विजेच्या धक्याने मृत्यु झाला. राजच्या मृत्यू नंतर ग्रामस्थांमध्ये प्रचंड संतापाची भावना निर्माण झाल्याने याच दिवशी दोघा कर्मचारी वर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली होती.मात्र उर्वरित दोषी वर कार्यवाही व राजच्या कुटुंबियांना घटनेला ५ दिवस उलटून गेल्यावर ही मदत जाहीर न झाल्याने काल डांगसौंदाणे ग्रामस्थांनी एकत्र येत तहसीलदार यांचेसह तालुक्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी, अधिकारीना निवेदन देण्याचा निर्णय घेतला. राजकुमारला येत्या १० फेब्रुवारी पर्यंत न्याय देण्यात आला नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा देत यास सर्वस्वी जबाबदार विजवीतरण कंपनीला धरण्यात येईल असा ही इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर गावातील प्रमुख नागरिकांसह मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गाच्या सह्या आहेत.