मधूर गुजराथी
चांदवड – चांदवड तालुक्यातील नांदुरटेक जवळील चिंचबारी वस्ती येथील दुर्गा रामलाल पवार (वय १६) ही जखमी अवस्थेत सापडली. २६ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता चिंचबारी जिल्हा परिषद शाळे जवळ देवळा चांदवड रोड वर दुर्गा रामलाल पवार ही मुलगी जखमी अवस्थेत आढळून आली. मुलीचे मामा समाधान धोंडीराम गोधडे व नातेवाईकांनी तिला उपचारासाठी चांदवड येथील जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सदर घटनेची खबर मामा समाधान गोधडे यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिली. तातडीने घटनास्थळी चांदवडचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर हे गेले त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत.