चांदवड- सबस्टेशन चांदवड ते पेट्रोलपंप चौफुली चांदवड या रस्त्याच्या आराखड्यात बदल करणे बाबत व नागरीकांच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत दिनांक १५ नोव्हेंबर रोजी एम.एस.आर. डी. सी . नाशिक येथील अभियंत्यांना सर्वपक्षीय निवेदन देण्यात आले.
चांदवड ते मनमाड या रस्त्याचे कॉक्रीटीकरण सुरू असून ठेकेदारामार्फत मनमाड चांदवड चौफुलीपासून रस्त्याच्या लगत ड्रेनेजचे ( गटारीचे ) काम सुरू आहे.सदर गटारीची उंची जमिनीपासून ४ फुट दिसत असून सदर गटारीमुळे चांदवड बाजारपेठेचा पारंपारीक येणे – जाणेचा रस्ता बंद झालेला असून ये – जा करणाऱ्या नागरीकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे . तसेच बाजारपेठेपासून पेट्रोलपंपापर्यंत ड्रेनेजची उंची समान असून कृषी उत्पन्न बाजार समिती लगतचे गाळे व रेणुका कॉम्प्लेक्सचे गाळे पाण्याखालील जाण्याची शक्यता आहे . त्यामुळे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते . तसेच रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या मध्यातील दुभाजकावर स्ट्रीटलाईट सबस्टेशन चांदवड ते पेट्रोलपंप चौफुलीवर बसविण्यात यावे. सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेवुन एम.एस .आर.डी.सी.मार्फत सदरील नकाशात बदल करण्यात यावा व नागकरीकांची गैरसोय टाळावी अन्यथा सर्वपक्षीय व चांदवड वासियांतर्फे चांदवड – मनमाड रस्ता बंद करून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल यास सर्वस्वी एम . एस . आर.डी.सी. प्रशासन जबाबदार राहील असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर चांदवड तालुका शिवसेना शहर प्रमुख संदीप उगले,पांडूरंग भडांगे,शांताराम घुले उमेश जाधव आदींच्या स्वाक्षरी आहेत.