शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

साहित्य संमेलन स्थळाची पाहणी करुन स्वागताध्यक्ष भुजबळांनी घेतली बैठक; या दिल्या सूचना

by India Darpan
नोव्हेंबर 15, 2021 | 7:47 pm
in इतर
0
IMG 20211115 WA0234

 

नाशिक– साहित्य संमेलनाचे आयोजन ही नाशिकचे नाव उंचावण्यासाठी लाभलेली महत्वाची संधी असून हे केवळ साहित्य संमेलन नाही तर शहर व जिल्ह्यासाठी हा महत्वाचा उत्सव आहे. सारस्वतांच्या हा मेळावा अधिक दर्जेदार व्हावा त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन व आयोजकांनी नियोजन करावे, अशा सूचना आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री व साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

ते आज भुजबळ नॉलेज सिटी येथे ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजनाबात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी माजी आमदार हेमंत टकले, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, मनपा आयुक्त कैलास जाधव, मुख्याधिकारी लीना बनसोड, अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, नोडल अधिकारी नितीन मुंडावरे, विश्वास ठाकूर, शंकर बोऱ्हाडे, रवींद्र पगार, दिलीप खैरे, डॉ.शेफाली भुजबळ,संजय करंजकर, आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नाशिक शहर व परिसर सुशोभीकरणावर अधिक भर देण्यात यावा. आपल्या दर्जेदार व्यवस्थेतून येणाऱ्या साहित्यप्रेमिंना ज्या सुविधा मिळतील त्यातून नाशिकचे नाव देशपातळीवर पोहचणार आहे. नागरिकांना येण्या-जाण्यासाठी शटल बस सेवा उपलब्ध करून देण्यात यावी. साहित्य संमेलनाचा उत्सव दर्जेदार होण्यासाठी नागरिकांचे सहकार्य तितकेच महत्वाचे असणार आहे. स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक आदरतिथ्य करणारे नाशिक याद्वारे अवघ्या साहित्य विश्वासमोर जाणार आहे.

ते पुढे म्हणाले, आयोजनाच्या संदर्भात लोकप्रतिनिधीं समवेत देखील आढावा बैठक आयोजित करण्यात येणार आहे. हे संमेलन ही प्रत्येकाचा जबाबदारी समजून कुठलीही कमतरता राहणार नाही यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आपण करू. पर्यटन विभागाचे केंद्र या संमेलन स्थळी उभारण्यात येऊन नाशिक जिल्ह्यातील पर्यटनाची माहिती उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगताना जिल्हा प्रशासन, माहापालिका प्रशासन पोलीस प्रशासनासह सर्व यंत्रणांनी आपापल्या परिने यांत योगदान देवून अनेक वर्षे स्मरणात राहील असे दर्जेदार साहित्य संमेलन व्हावे, अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली. यावेळी साहित्य संमेलन स्थळाची पाहणी करून तेथे करण्यात आलेल्या सेवा-सुविधांची माहिती पालकमंत्री भुजबळ यांनी करून घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत माजी आमदार हेमंत टकले, विश्वास ठाकूर, जयप्रकाश जातेगावकर यांनी सहभाग घेतला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – जिल्हयात कोरोना रुग्णांची ही आहे तालुकानिहाय स्थिती

Next Post

चांदवड – रस्त्याच्या आराखड्यात बदल करावा,अन्यथा रास्ता रोको; अभियंत्यांना दिले सर्वपक्षीय निवेदन

Next Post
IMG 20211115 WA0266

चांदवड - रस्त्याच्या आराखड्यात बदल करावा,अन्यथा रास्ता रोको; अभियंत्यांना दिले सर्वपक्षीय निवेदन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

GrD PPPacAALypi e1747393097735

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर…उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

मे 16, 2025
1500x500 1024x341 1 e1747389571661

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅट्ट्रिक…५८ सुवर्ण, ४७ रौप्य, ५३ कांस्यसह १५८ पदकांची लयलूट

मे 16, 2025
accident 11

भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ५४ वर्षीय पादचारीचा मृत्यू

मे 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

या ठिकाणी जप्त केलेल्या २३ वाहनांची लिलावाव्दारे होणार विक्री….

मे 16, 2025
old man

एल्डर लाईन १४५६७: ज्येष्ठांसाठी आधारवड ठरणारी मदतीची शासकीय सेवा..

मे 16, 2025
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारत सरकारने तुर्कीच्या या कंपनीला दिलेली सुरक्षा परवानगी केली रद्द….

मे 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011