चांदवड – पावसामुळे तालुक्यातील चिंचोले येथे टोमॅटो पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पहिलेच कोरोनाच्या संकटाला तोंड देत उभा असलेल्या शेतक-यांचे असे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी पहावे तरी कुणाकडे ? अशी प्रतिक्रिया येथील शेतक-यांनी व्यक्त केली आहे. एकीकडे पीकविमा काढण्यासाठी शासन प्रयत्न करीत असताना ही परिस्थितीत ओढवली आहे. तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी चंद्रकांत जाधव यांनी सांगितले की, पावसाची रिपरिप ९ ते १० दिवस झाल्याने टमाटे पिकाचे नुकसान झाले आहे. टोमॅटोवर काळ्या रंगाचे टिपके पडल्याने संपूर्ण माल खराब होऊन उखरड्यात फेकून देण्यात आलेला आहे. सदर शेतीमाल २५० ते ३०० रु कॅरेट ने जात असताना असे टिपके पडल्यामुळे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. एकीकडे पीकविमा काढण्यासाठी शासन प्रयत्न करीत असताना काही ठिकाणी पैसे न मिळाल्याने पीक विमे काढले नाहीत व आता असे संकट आल्याने तोंडचा घासच पळाला असल्याचेही ते म्हणाले.