चांदवड – काल चांदवड येथील रेणुका देवी मंदिर येथे विधान परिषद उपसभापती डॅा. नीलिमा गो-हे आणि नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी डॅा. गो-हे यांना चांदवडला शहरासाठी विकासकामांना निधी मिळणे बाबत निवेदन देण्यात आले. त्याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील पाटील, उपजिल्हाप्रमुख नितीन दादा आहेर, तालुकाप्रमुख विलास भवर, गटनेता जगन आबा राऊत, गुड्डू खैरनार, दिपक शिरसाट, प्रसाद प्रजापत, मुकेश कोतवाल, बाळू वाघ, विनायक हांडगे, राज केदारे, अपर्णा गुजराती, सुरज भोसले उपस्थित होते