चांदवड:- चांदवड येथील एसएनजेबी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा. अंकित गुजराथी व प्रा. किरण गोरे यांनी विद्यार्थ्यांच्या पालकाला प्लाझ्मा दान दिले. महाविद्यालयातील तृतीय वर्ष मेकॅनिकल विभागामध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी संघर्ष केदु आहेर याचे वडील केदु हरीभाऊ आहेर व आजोबा हरीभाऊ मालजी आहेर राहणार वराडी तालुका चांदवड या दोघे कोरोनाबाधित रुग्णांना ‘बी’ पॉजिटीव्ह प्लाझ्माची तातडीची गरज असल्याने महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागातील प्रा. अंकित गुजराथी व प्रा. किरण गोरे यांना कळताच त्यांनी मालेगावहुन नाशिक येथे जाऊन प्लाझ्मा दान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला.
या स्तुत्य उपक्रमाबद्दल संस्थेचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलालजी संचेती, विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे समन्वयक दिनेशकुमारजी लोढा,सेक्रेटरी जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित कुमारजी सुराणा, उपाध्यक्ष अरविंदकुमारजी भन्साळी, समन्वयक झुंबरलालजी भंडारी,सुनीलकुमारजी चोपडा, प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे ,उपप्राचार्य डॉ. एम. आर. संघवी, विभाग प्रमुख डॉ.एस डी. संचेती आदीनी प्रा. अंकित गुजराथी व प्रा. किरण गोरे यांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.