चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांदा-द्राक्ष प्रश्नावरील विविध मागण्यांसाठी नाशिकच्या चांदवड येथे सर्वपक्षीय नेते व शेतकऱ्यांच्या उपोषणाला सुरुवात झाली. कांदा लिलाव बंद पाडल्यानंतर माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू झाले. कांदा तयार करण्यासाठी १ क्विंटलला १५०० रुपये खर्च येतो म्हणून कांद्याला ३००० हजार रुपये मिळावे. आज पर्यंत विक्री झालेल्या कांद्याला १५०० रुपये अनुदान मिळावे, नाफेडची खरेदी सुरू झालेली नाही ती सुरू करावी व ३०००नहजार रुपये भाव मिळावा, द्राक्ष उत्पादकांना खर्चा साठी २५ रुपये अनुदान मिळावे, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्याना तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशा विविध मागण्यांसाठी चांदवडच्या बाजार समिती आवारात हे उपोषण सुरू झाले. कांद्या बरोबरच अन्य भाजीपाल्याला भाव नसल्याने उपोषणस्थळी भाजीपाला ओतण्यात येऊन केंद्र व राज्यसरकरचा निषेध करण्यात आला.