मधूर गुजराथी
चांदवड – चांदवड तालुक्यातील पुरी येथे गुरुवार सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास तीन जणांना पिसाळलेल्या कुत्र्यांने चावा घेतला. त्यानंतर कानमंडाळे शिवारात या कुत्र्याला मारण्यात आले आहे. सकाळी या पिसाळलेल्या कुत्र्याने एका गायीला चावा घेतला. त्यानंतर भारती सोमनाथ पानसरे (३२) रा. पुरी, उत्तम पोपट पवार ( ६०) रा. कुंभारी, चंदु सावळीराम मोरे (३८) रा. कानमंडाळे या तिघांना या पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. पुरी येथून हे कुत्रे चावा घेत कानमंडाळे शिवारात दहा वाजेच्या सुमारास आले. तेथे चंदु मोरे यास चावा घेतल्याबरोबर चंदु मोरे यांनी या कुत्र्याला दगडाने मारले. दरम्यान या तीघांना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात डॉ. पालवी यांनी औषधोपचार केले. तर दिघवद येथे ऋृषीकेश वसंत गांगुर्डे (२०) या तरुणाला कुत्र्याने चावा घेतल्याने आज दिवसभरात चार जणांना कुत्र्यांने चावा घेतल्याची घटना घडल्याने पुरी व दिघवद परिसरात घबराट पसरली आहे.