विशेष प्रतिनिधी, पुणे
भारतीय इतिहासात आचार्य चाणक्य एक कुशल राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ आणि मुत्सद्दी म्हणून ओळखले जात होते. चाणक्या यांनी आपल्या धोरणांद्वारे एका साध्या मूलाला म्हणजेच चंद्रगुप्त यांना मौर्य घराण्याचा सम्राट बनविले. आर्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात वर्णन केलेल्या धोरणांचा अवलंब केल्याने एखादी व्यक्ती आपल्या जीवनातील अडचणींवर विजय मिळवू शकते.
आचार्य चाणक्य यांनी एका श्लोकाद्वारे सांगितले आहे की, ज्या गोष्टींपासून जीवनात आनंद हिरावून घेतला जातो, त्यापासून अंतर ठेवणे आवश्यक आहे. आपल्याला आजच्या काळातही चाणक्य नीति (धोरण) उपयुक्त ठरणारी आहे. काय आहेत या नीतीतील गोष्टी जाणून घेऊ या…
अहंकार
चाणक्य म्हणतात की, अहंकारी व्यक्ती आयुष्यात कधीच सुखी नसते. अशा व्यक्तीस कधीही आदर मिळत नाही आणि त्याच्या हातात यशही मिळत नाही. मनुष्य नेहमी गोड बोलणारा असावा, प्रत्येकजण अशा व्यक्तीचा आदर करतो, तर गर्विष्ठ माणूस आयुष्यात एकटाच राहतो.
अज्ञान
चाणक्यच्या मते एखाद्या व्यक्तीला शिक्षित करणे खूप महत्वाचे आहे. सुशिक्षित व्यक्तीला समाजात नेहमीच आदर मिळतो. एक सुशिक्षित माणूस स्वत: ला अडचणींमधून बाहेर काढतो. त्यामुळे अज्ञानापासून दूर रहा आणि ज्ञान मिळवा.
लोभाची भावना
चाणक्य म्हणतात की, जर एखाद्याच्या मनात लोभाची भावना असेल तर त्याला फक्त दुःख होते. लोभी व्यक्तीचे यश जास्त काळ टिकत नाही. अशा व्यक्तींना वाईट कृत्य करण्यास भाग पाडले जाते.
मत्सर
चाणक्य सांगतात की, मत्सर ही अशी भावना असते जेव्हा ती एखाद्या व्यक्ती जेव्हा मनात येते तेव्हा व्यक्ती कधीच आनंदी नसते. हेवा वाटणारी व्यक्ती नेहमीच दुसर्याच्या आनंदात मत्सर करते. तसेच जीवनात यश मिळविण्यासाठी ईर्ष्यापासून दूर राहावे.