मुंबई – लग्नानंतर प्रत्येक घरात छोट्या-मोठ्या स्वरुपातील कलह होतात. वाद-विवाद होतात. कमी-जास्त प्रमाणात असतील, पण वाद ठरलेलेच आहेत. दुसरीकडे काहींचे लग्न झाल्यावर प्रगती होऊ लागते म्हणून पत्नीचा पायगुण आणि अधोगती झाली तरी पत्नीचाच दोष. कशा स्त्रीसोबत लग्न केले म्हणजे आयुष्य सुखी होऊ शकते, असे भारतातील महान विद्वान चाणक्य यांनी सांगून ठेवले आहे. बघुया चाणक्य नीती काय म्हणते…
चाणक्यांची नीती अंमलात आणली तर आयुष्यात प्रगती ठरलेली आहे, असा भारतात समज आहे. विशेषतः राजकारणात चाणक्य नीतीचा अवलंब करणाऱ्यांना सत्तेची गोडीही चाखता आली आहे. आचार्य चाणक्यांमुळेच चंद्रगुप्त मौर्य राजा बनू शकले होते. तसेच चाणक्यांनी स्त्रीच्या संदर्भातही काही गोष्टी सांगून ठेवल्या आहेत.
धार्मिक स्त्री
आचार्य चाणक्य यांनी सांगितल्यानुसार, धार्मिक विचारांच्या स्त्रीसोबत लग्न केल्याने पतीचा भाग्योदय होतो. ज्या घरात नियमीत पुजापाठ होते, तिथे ईश्वराचा वास असतो. अश्या घरात कुठल्याही समस्या येत नाहीत. आणि आल्याच तर त्यावर तातडीने तोडगा निघतो.
अल्पसमाधानी स्त्री
आचार्य चाणक्य म्हणतात की अल्पसंतुष्टी किंवा अल्पसमाधानी स्त्रीसोबत लग्न केल्याने पुरुषाचे भाग्य फळाला लागते. अशी स्त्री कुठल्याही परिस्थितीत पतीचा साथ देते.
धैर्यवान स्त्री
धैर्य बाळगणारी व्यक्ती आयुष्यात कधीच अपयशी होत नाही. आचार्य चाणक्यांनी सांगितल्यानुसार धैर्यवान स्त्रीसोबत लग्न केल्याने आयुष्य सुखी होते. त्यामुळे जीवनात धैर्य असणे खूप आवश्यक आहे, असे चाणक्य म्हणतात.
शांत स्त्री
क्रोधामुळे जीवन उध्वस्त होत असते. त्यामुळे चाणक्य म्हणतात की क्रोध न करणाऱ्या शांत स्त्रीसोबत लग्न केल्याने संसारही शांततेत होतो. जिथे क्रोध करणारे लोक नसतात त्या घरात ईश्वराचा वास असतो, असे चाणक्य म्हणतात.
मितभाषी स्त्री
पुरुष जरासा क्रोधी असला तरीही स्त्री मीतभाषी असावी. चाणक्य म्हणतात की मितभाषी स्त्रीसोबत लग्न केल्याने पुरुषाचे भाग्य बदलते. अश्या स्त्रीमुळे घरातील वातावरण नेहमी आनंदी राहते.