नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक यांना मोठा दणका दिला आहे. केंद्र सरकारने लोकसभेत सांगितले की, कोरोना महामारीच्या काळात केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा रोखून ठेवलेला १८ महिन्यांचा महागाई भत्ता (DA) त्यांना दिला जाणार नाही. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लेखी उत्तर स्पष्ट केले की, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्त्याच्या तीन हप्त्यांची थकबाकी आणि महागाई सवलत देण्याची कोणतीही योजना नाही.
1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 रोजी जारी करण्यात येणारा महागाई भत्ता बंद करण्याचा निर्णय हा कोरोना महामारीमुळे झालेल्या आर्थिक विस्कळीतपणामुळे घेण्यात आला आहे, जेणेकरून सरकारवरील आर्थिक भार कमी करता येईल. . याद्वारे सरकारने 34,402.32 कोटी रुपयांची बचत केली होती. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका तसेच, या वर्षी अनेक राज्यात होत असलेल्या निवडणुका लक्षात घेता केंद्र सरकारने महागाई भत्त्याबाबत हा मोठा निर्णय घेतला आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारक यांना खुष करण्यासाठी १८ महिन्यांचा महागाई भत्ता एकरकमी दिला जाईल, असे बोलले जात होते. मात्र, आता सरकारने सर्व काही स्पष्ट केले आहे.
Central Government Employees Pensioners Dearness Allowance