इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने सहाय्यक अधीक्षक, पोस्ट ऑफिस, मुख्यालय, वाराणसी, पश्चिम विभाग, वाराणसी, उत्तर प्रदेश आणि जीडीएस-एबीपीएम, शाखा-खेवाली, वाराणसी, उत्तर प्रदेश, या दोघांना २० हजार रुपयांचा अनुचित फायदा स्वीकारताना अटक केली आहे.
१२ मार्च रोजी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तक्रारदाराच्या नियुक्तीच्या ठिकाणी भेट दिली आणि शाखेच्या आधार रजिस्टरची तपासणी केली. पोस्ट ऑफिसमधून बाहेर पडताना, आरोपीने आधार रजिस्टर सोबत नेले आणि आधार रजिस्टर परत केल्याबद्दल आणि तक्रारदाराविरुद्ध कोणतीही कारवाई न केल्याबद्दल, अनुचित फायदा मागितला.
सीबीआयने १३ जून रोजी सापळा रचला आणि दोन्ही आरोपींना रंगेहाथ पकडले. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना १४ जून रोजी सक्षम न्यायालयात हजर केले. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.