मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील कॅन्टॉन्मेंड बोर्डांच्या निवडणुकीची घोषणा होताच राजकीय पक्षांनीही तयारी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षाने यासंदर्भात त्यांचे एक पाऊल पुढे टाकले आहे. यावर्षी राज्यात होणाऱ्या कॅन्टोन्मेंट निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे निवडणूक प्रमुखांची घोषणा केली आहे.
भाजपचे निवडणूक प्रमुख असे
पुणे – आमदार सुनील कांबळे,
शिवाजीनगर – आमदार सिद्धार्थ शिरोळे,
देहू – माजी आमदार संजय (बाळा) भेगडे
देवळाली (जि. नाशिक) – माजी आमदार बाळासाहेब सानप
अहमदनगर – महेंद्र (भय्या) गंधे
छत्रपती संभाजीनगर – संजय केनेकर
नागपूर – डॉ. राजीव पोतदार .
https://twitter.com/cbawankule/status/1631214330694754305?s=20
Cantonment Election BJP Chief Appointments