आपली रास कर्क आहे का?
2023 असं जाईल जाणून घ्या
आपले नवे वर्ष कसे जाईल, अशी प्रत्येकाला उत्सुकता असते. वाचकांच्या आग्रहास्तव सर्व बारा राशींच्या लोकांना नवे वर्ष कसे जाणार याबाबत रोज एका राशीचा अंदाज दहा टिप्सच्या स्वरूपात आपण देत आहोत. आज आपण कर्क राशीविषयी जाणून घेऊया…
कर्क राशीवर चंद्र ग्रहाची मालकी आहे. कर्क राशीचा जलप्रदेश, समुद्र, नदी किंवा समुद्र किनारा यांचा जवळचा संबंध मानला जातो. कर्क रास पृष्ठोदयी आहे. उत्तर दिशेकडे विशेष बलवान असते.
साधारणपणे कर्क रास चंचल, कोमल, सौम्य पण अस्थिर स्वभावाची दिसून येते. ही रास रजोगुणी, जलतत्त्वयुक्त आहे. तसेच रात्री बलवान असणारी, कफ प्रकृतीची, स्त्री प्रधान आणि बहुसंततीयुक्त आहे. या राशीचे गुण म्हणजे चिवटपणा, लज्जा आणि विवेक असे आहेत.
कर्क राशी घेऊन जन्मलेल्या मुलाच्या नावाचे आद्याक्षर ही, हू, हे, दा, दि, दे किंवा दो अशी असतात.
कर्क रास
१) कर्क राशीच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सॉफ्टवेअर, डिझायनिंग, आर्किटेक्ट, मॅथेमॅटिक्स, भौतिकशास्त्र, मायक्रोबायोलॉजी या क्षेत्रांमध्ये विशेष लक्ष द्यावे…
२) भागीदारी करणाऱ्यांनी अधिक लांबचे करार न करता वार्षिक करार करावे व अनुभवाने त्यात पुढे बदल करावे…
३) विवाह इच्छुकांना त्यांच्या स्वप्नातला जोडीदार शोधायला जास्त प्रयत्न करावे लागतील. विवाह ठरण्याचा आवश्यक विविध पर्याय वापरावे लागतील..
४) केवळ ओळखीच्या अथवा नातेवाईक व्यक्तीने सांगितले म्हणून त्वरित कुठे गुंतवणुकीच्या लोभात पडू नये…
५) श्वासा संबंधित त्रास, छातीचे दुखणे, डावा खांदा दुखणे याकडे दुर्लक्ष करू नये..
६) कुटुंबाअंतर्गत अथवा नातेवाईकांमधील दिवाणी दावे तडजोडीने अथवा सामोपचाराने सोडवावे….
७) अनेक महत्त्वाची रेंगाळलेली कामे नवीन वर्षात पूर्ण होणार आहेत….
८) महिला वर्गाची स्वयंपाक घर सुशोभीकरणाची इच्छा पूर्ण होईल. त्याचप्रमाणे विमान प्रवास घडेल….
९) सामाजिक तसेच राजकारण क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभदायक ठरेल….
१०) नवीन मोठे वाहन खरेदी त्याचप्रमाणे व्यावसायिक वाहन खरेदी, भरपूर प्रवास याचीही इच्छा पूर्ण होणार आहे..
टीप – वरील टिप्स या कर्क राशीसाठी सर्वसमावेशक आहेत. कर्क राशीत असलेली आश्लेषा, पुनर्वसू, पुष्य या नक्षत्राप्रमाणे भिन्न तसेच कुंडली पाहून व्यक्तिगत सविस्तर सल्ला दिला जाईल….
महाराष्ट्रभर वास्तू व्हिजिट कॉम्प्युटर कुंडली शुभनवरत्न व्यक्तिगत सविस्तर ज्येष्ठ मार्गदर्शन
भवानी ज्योतिष.. पं. दिनेशपंत ..फक्त व्हाट्सअप संपर्क 9373 91 34 84….
सर्व राशीच्या वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा