मंगळवार, सप्टेंबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसार माध्‍यमांसमोर केले हे निवेदन

by Gautam Sancheti
जानेवारी 31, 2023 | 1:52 pm
in राष्ट्रीय
0
modi

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधाने नरेंद्र मोदी यांनी प्रसार माध्‍यमाच्या प्रतिनिधींसमोर निवेदन केले. यावेळी ते म्हणाले की, २०२३ या नववर्षात आज संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे आणि अगदी आरंभापासूनच अर्थकारणात ज्यांच्या मतांना महत्व आहे, अशाप्रकारची मते एक सकारात्मक संदेश घेऊन येत आहेत, एक आशेचा किरण घेऊन आणि नवीन उत्साह घेऊन येत आहे. आज एक महत्वपूर्ण दिवस आहे. भारताच्या राष्ट्रपती आज प्रथमच संसदेच्या संयुक्त सभागृहांना मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रापतीजींचे भाषण म्हणजे भारताच्या संविधानाचा सन्मान आहे, भारताच्या संसदीय प्रणालीचा गौरव आहे आणि आज मुख्यत्वे महिलांच्या सन्मानाचा क्षण आहे तसेच तो दुर्गम भागात वनांमध्ये आपले जीवन व्यतीत करणाऱ्या आपल्या देशाच्या महान आदिवासी परंपरेच्या गौरवाचा देखील क्षण आहे. भारताच्या वर्तमान राष्ट्रपतींचे आज संसदेत होणारे पहिले भाषण हा केवळ संसद प्रतिनिधींसाठी नव्हे तर संपूर्ण भारतासाठी एक अभिमानाचा क्षण आहे.

हे निवेदन देतांना ते पुढे म्हणाले की, आपल्या संसदीय कार्यकाळातील मागील सहा सात दशकांमध्ये जी परंपरा रुजली आहे, त्यावरून असे दिसून आले आहे की, सभागृहात बोलण्यासाठी पहिल्यांदाच उभा राहणारा कोणीही नवा संसदपटू हा कोणत्याही पक्षाचा का असो , तो जेव्हा प्रथमच सभागृहात बोलतो तेव्हा संपूर्ण सभागृह त्यांचा आदर करते, अशा प्रकारे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि एक अनुकूल वातावरण तयार होते. ही एक उत्तम आणि उदात्त परंपरा आहे. आज राष्ट्रपतींचे भाषण देखील त्यांचे पहिलेच भाषण आहे, आजचा हा क्षण सर्व खासदारांच्या वतीने आशा, उत्साह आणि उर्जेने परिपूर्ण बनविणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मला विश्वास आहे की आपण सर्व संसदपटू या जबाबदारीचे कसोशीने पालन करू. आपल्या देशाच्या वित्तमंत्री देखील महिला आहेत आणि त्या उद्या आणखी एक अर्थसंकल्प देशासमोर सादर करणार आहेत.

आजच्या जागतिक परिस्थितीत भारताच्या अर्थसंकल्पाकडे केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष आहे. जागतिक अर्थव्यवस्था डळमळीत असताना, भारताचा अर्थसंकल्प भारतातील सर्वसामान्य माणसांच्या आशा – आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न तर करेलच मात्र जगाला भारतामध्ये जो आशेचा किरण दिसत आहे तो अधिक दैदिप्यमान होईल. मला मनोमन खात्री आहे की, निर्मलाजी या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी अथक परिश्रम घेतील. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचे ‘इंडिया फर्स्ट सिटिझन फर्स्ट’- अर्थात ‘सर्वात आधी देश , सर्वात आधी देशवासी’ हे एकच उद्दिष्ट, एकच बोधवाक्य, एकच ध्येय आणि हाच विचार आपल्या कार्यसंस्कृतीच्या केंद्रस्थानी राहिला आहे. तोच जोश पुढे नेत या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही चर्चा होईल. पण चर्चा ही व्हायला हवी. आणि मला विश्वास आहे की आमचे विरोधी पक्ष नेते अतिशय बारकाईने अभ्यास करून पूर्ण तयारीनिशी आपले म्हणणे सभागृहासमोर मांडतील. देशाच्या धोरणात्मक निर्णयांवर सभागृहात चांगले विचारमंथन होईल आणि यातूनच देशासाठी उपयुक्त ठरेल असे, अमृत प्राप्त होईल असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आजपासून खुले झाले ऐतिहासिक अमृत (मुघल) उद्यान; बघण्यासाठी येथे करा बुकींग…

Next Post

गुटख्याची वाहतूक करणा-या दुचाकीवरील दोघांना पोलिसांनी केले गजाआड; २० हजार रूपयाचा गुटखा जप्त

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

rohit pawar
महत्त्वाच्या बातम्या

सिडको जमीन घोटाळ्याप्रकरणी SIT स्थापन…रोहित पवारांकडून स्वागत

सप्टेंबर 9, 2025
crime 13
संमिश्र वार्ता

धक्कादायक….चणकापूरच्या आश्रमशाळेत वैद्यकिय मदत न मिळाल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू…मुख्याध्यापक, अधीक्षक निलंबित

सप्टेंबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चाची तयारी ठेवावी, जाणून घ्या, मंगळवार, ९ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 8, 2025
INDIA GOVERMENT
संमिश्र वार्ता

भारत सरकारमधील विविध पदांवर थेट नेमणूक…येथे करा ऑनलाईन अर्ज

सप्टेंबर 8, 2025
andolan 1
राज्य

संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते करणार विदर्भ दौरा…आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवाराशी साधणार संवाद

सप्टेंबर 8, 2025
Untitled 4
महत्त्वाच्या बातम्या

नेपाळमध्ये निषेध मोर्चात १८ जणांचा मृत्यू, २५० हून अधिक लोक जखमी

सप्टेंबर 8, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

आता राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम…

सप्टेंबर 8, 2025
reliance retail
संमिश्र वार्ता

रिलायन्स रिटेल पहिल्याच दिवशी कमी जीएसटी दरांचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवणार….

सप्टेंबर 8, 2025
Next Post
crime 1234

गुटख्याची वाहतूक करणा-या दुचाकीवरील दोघांना पोलिसांनी केले गजाआड; २० हजार रूपयाचा गुटखा जप्त

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011