India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

वय वर्ष २०… बी टेकची विद्यार्थिनी… २९ आठवड्यांची गर्भवती… गर्भपाताबाबत सुप्रीम कोर्टाने घेतला हा निर्णय

India Darpan by India Darpan
January 19, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –  २० वर्षीय अविवाहित बीटेक विद्यार्थिनी गर्भवती आहे. तिच्या पोटातील गर्भ आता २९ आठवड्यांचा झाला आहे. तिला गर्भपात करण्याची इच्छा आहे. यासंदर्भात तिने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यासंदर्भात न्यायालयाने एम्सच्या डॉक्टरांची टीम तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. २९ आठवड्यांनंतर सुरक्षितपणे गर्भपात करता येईल का, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. या प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने एम्सच्या संचालकांना २० जानेवारीला महिलेची वैद्यकीय तपासणी करून अहवाल सादर करण्यासाठी डॉक्टरांची एक टीम तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने गर्भपात प्रकरणी मोठा निकाल दिला होता. न्यायालयाने म्हटले होते की, महिला विवाहित असो किंवा अविवाहित, प्रत्येकाला गर्भपात करण्याचा अधिकार आहे. या आदेशानंतर सर्व महिलांना २४ आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याची परवानगी देण्यात आली होती.

कायदा काय आहे?
मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी (एमटीपी) कायद्यांतर्गत, विवाहित महिलांच्या विशेष श्रेणीसाठी, बलात्कार पीडित आणि अपंग आणि अल्पवयीन मुलांसह इतर असुरक्षित महिलांसाठी गर्भपाताची उच्च वेळ मर्यादा २४ आठवडे होती, तर अविवाहित महिलांसाठी हीच वेळ मर्यादा २० आठवडे होती. आठवडे ही तफावत दूर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

BTech Girl Student 29 Week Pregnancy Abortion Supreme Court


Previous Post

रोहित शर्माला त्याचा प्रश्नच पडला भारी; इशान किशनने अशी उडवली खिल्ली (बघा व्हिडिओ)

Next Post

अंबानींची धाकटी सून राधिका हिची अशी आहे आलिशान जीवनशैली.. इतकी आहे संपत्ती.. जाणून घ्या तिच्याविषयी सर्वकाही…

Next Post

अंबानींची धाकटी सून राधिका हिची अशी आहे आलिशान जीवनशैली.. इतकी आहे संपत्ती.. जाणून घ्या तिच्याविषयी सर्वकाही...

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

February 1, 2023

खळबळजक! शेतकरी महिलेच्या शरीराचे तुकडे करुन खून; मालेगाव तालुका हादरला

January 31, 2023
प्रातिनिधीक फोटो

विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आता भरावे लागणार एवढे परीक्षा शुल्क; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

January 31, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगर उत्पादक महेंद्र छोरिया यांना पुरस्कार

January 31, 2023

महाराष्ट्र भूषण पुरस्कारार्थींना मिळणार आता एवढे लाख रुपये; राज्य सरकारची घोषणा

January 31, 2023

निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

January 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group