इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल (BSNL) आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन प्लॅन आणून ऑफर्सची घोषणा देखील केले जाते. आता कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. हा प्लॅन वर्क फ्रॉम होम करणाऱ्या यूजर्ससाठी बेस्ट आहे. या प्लॅन अंतर्गत यूजर्सला दरमहिन्याला ७५ जीबी डेटा मिळेल.
ज्या यूजर्सला जास्त डेटाची गरज असते, अशांसाठी हा प्लॅन फायद्याचा ठरेल. प्लॅनमध्ये यूजर्सला लाँग व्हॅलिडिटी देखील मिळते. BSNL च्या या प्लानची किंमत २०२२ रुपये आहे. BSNL या आपल्या २०२२ रुपयांच्या नवीन प्रीपेड प्लॅनमध्ये जबरदस्त बेनिफिट्स देत आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सला दर महिन्याला ७५ जीबी डेटा मिळेल. या प्रीपेड प्लानची वैधता ३०० दिवस आहे. प्लॅनमध्ये देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगचा फायदा मिळेल.
याशिवाय, दररोज १०० मोफत एसएमएस देखील मिळतात. दरमहिन्याला मिळणारा ७५ जीबी डेटा समाप्त झाल्यास ४० Kbps च्या स्पीडने इंटरनेट वापरू शकता. मात्र, लक्षात घ्या डेटाचा फायदा केवळ सुरुवातीच्या ६० दिवस मिळतो. त्यानंतर इंटरनेट वापरण्यासाठी तुम्हाला डेटा व्हाउचरसह रिचार्ज करावा लागेल.
BSNL ने या प्रीपेड रिचार्ज प्लान्सला खास ‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्ताने लाँच केले आहे. ही ऑफर फक्त या महिनाअखेर पर्यंतच उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हाला जर या वाउचरचा फायदा घ्यायचा असल्यास याच महिन्यात रिचार्ज करावा लागेल. दरम्यान, बीएसएनएल सध्या केवळ ३जी सर्विस ऑफर करत आहे. लवकरच कंपनी देशभरात ४जी नेटवर्क लाँच करण्याची शक्यता आहे.
सध्या सर्वच टेलिकॉम ऑपरेटर्सनी आपल्या प्लॅन्सच्या किमती वाढवल्या आहेत, तिथे BSNL अजूनही सर्वात स्वस्त प्लॅन्स ऑफर करत आहे. आता BSNLने ग्राहकांसाठी जबरदस्त प्रीपेड प्लॅन लॉन्चच केला आहे. ही ऑफर आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत लॉन्च करण्यात आली आहे. आणि त्याचा लाभ 31 ऑगस्टपर्यंत घेता येणार आहे. दरम्यान, BSNL लवकरच आपले 4G नेटवर्क लॉन्च करणार आहे. कंपनीकडून यावर वेगाने काम सुरू आहे. त्यामुळे या वर्षाच्या अखेरपर्यंत BSNL 4G मिळण्याची अपेक्षा आहे.
BSNL Mobile Recharge Plan 75GB Deta