पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने त्यांचे २ नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन लॉन्च केले आहेत. हे प्लॅन २६९ आणि ७६९ रुपयांचे आहेत. BSNL च्या या प्रीपेड रिचार्ज प्लॅनची वैधता अनुक्रमे ३० दिवस आणि ९० दिवस आहे. BSNL या वर्षाच्या अखेरीस आपली 4G सेवा सुरू करणार आहे. त्याचबरोबर कंपनी पुढील वर्षी 5G सेवा आणण्याची तयारी करत आहे.
२६९ रुपयांचा प्लॅन
BSNL चा २६९ रुपयांचा प्लान ३० दिवसांच्या वैधतेसह येतो. सरकारी टेलिकॉम कंपनीच्या या प्लॅनमध्ये दररोज २GB डेटा मिळतो. म्हणजेच प्लॅनमध्ये एकूण ६०GB डेटा देण्यात आला आहे. याशिवाय, प्लॅनमध्ये अमर्यादित मोफत कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. या प्लॅनमध्ये BSNL Tunes देखील उपलब्ध आहे, ज्यामध्ये वापरकर्ते कोणत्याही मर्यादेशिवाय गाणी बदलू शकतात. याशिवाय, चॅलेंज एरिना गेम्स, इरॉस नाऊ एंटरटेनमेंट, लिस्टन पॉडकास्ट सर्व्हिसेस, हार्डी मोबाइल गेम सर्व्हिसेस, लोकधुन आणि झिंग यांचाही या योजनेचा फायदा होतो.
७६९चा प्लॅन
बीएसएनएलचा ७६९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची वैधता ९० दिवसांची आहे. प्लॅनमध्ये दररोज २GB डेटा दिला जातो. म्हणजेच प्लॅनमध्ये एकूण १८०GB डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित मोफत कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय, प्लॅनमध्ये चॅलेंज एरिना गेम्स, इरॉस नाऊ एंटरटेनमेंट, लिस्टन पॉडकास्ट सर्व्हिसेस, हार्डी मोबाइल गेम सर्व्हिसेस, लोकधून आणि झिंगचे फायदे आहेत.
BSNL Launch 2 Recharge Plans Features