विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
सध्याच्या काळात अत्यंत आवश्यक मानली जाणारी गोष्ट म्हणजे मोबाईल फोन होय. सहाजिकच टेलिकॉम कंपन्यांनी मोबाईल ग्राहकांसाठी वेगळे प्लॅन आणले आहेत. त्यातच सरकारी आणि खासगी कंपन्यांमध्ये एक प्रकारे स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांवर बाजी मारण्यासाठी बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी धमाकेदार प्लॅन बाजारात आणले आहेत.
आपण सर्वोत्तम 4G प्रीपेड प्लॅन शोधत असाल तर BSNL चा 30 दिवसांचा वैधता प्लॅन वापरू शकता. सदर कंपनीचा हा प्लॅन स्पेशल टॅरिफ व्हाउचर म्हणजेच STV आहे आणि त्याची किंमत फक्त २४७ रुपये आहे. विशेष म्हणजे या प्लॅनमध्ये ५० GB डेटासह आणखी बरेच फायदे मिळतील. तसेच हा प्लॅन जे २८ दिवसांच्या ऐवजी पूर्ण एक महिन्याच्या वैधतेच्या प्लॅनसह रिचार्ज करू इच्छितात, त्यांच्यासाठी अत्यंत चांगला आहे. या प्लॅनची खास गोष्ट म्हणजे यात उपलब्ध डेटा कोणत्याही दैनंदिन डेटा मर्यादेशिवाय देण्यात येतो.
बीएसएनएलचा हा प्लॅन ३० दिवसांच्या वैधतेसह येतो. या योजनेत कंपनी देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग ऑफर करत आहे. दररोज १०० मोफत एसएमएस देणाऱ्या या प्लॅनमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी एकूण ५० जीबी डेटा मिळेल.या प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे हे कोणत्याही दैनंदिन डेटा मर्यादेशिवाय येते. त्यामुळे एका दिवसात प्लॅनमध्ये उपलब्ध ५० जीबी डेटा खर्च करू शकता किंवा हवे असल्यास तुम्ही ते संपूर्ण वैधता कालावधीसाठी देखील चालवू शकता. या प्लॅनमध्ये उपलब्ध ५० GB डेटा खर्च झाल्यानंतर इंटरनेट स्पीड 80Kbps वर येईल.
या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेला डेटा वैधता संपण्यापूर्वी खर्च केला असेल तर वापरकर्ते त्यांना हवे असल्यास कंपनीच्या 4G डेटा अॅड-ऑन व्हाउचरसह रिचार्ज देखील करू शकतात. तसेच प्लॅनमध्ये, BSNL Tunes व्यतिरिक्त, Eros Now मध्ये देखील मोफत प्रवेश मिळतो.