मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इन्फोसिसच्या शेअर्सच्या मोठ्या घसरणीमुळे आयटी कंपनीच्या बाजार भांडवलातून अब्जावधी डॉलर्स गायब झाले आहेत. अंदाजापेक्षा कमाई कमी राहिल्याने जानेवारी ते मार्च या तिमाहीत कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. चौथ्या तिमाहीत इन्फोसिसचा नफा ७.८ टक्क्यांनी वाढून ६१२८ कोटी रुपये झाला आहे. यापूर्वी डिसेंबर तिमाहीत कंपनीने ६५८६ कोटी रुपयांचा नफा कमावला होता. कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या या घसरणीमुळे भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) आणि मूर्ती कुटुंबासारख्या प्रमुख भागधारकांना सोमवारी ट्रेडिंगच्या पहिल्या काही सेकंदात मोठा धक्का बसला आहे.
इन्फोसिसमध्ये LIC ची ७.७१ टक्के हिस्सेदारी आहे. देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीकडे डिसेंबर तिमाहीच्या अखेरीस IT कंपनीचे २८,१३,८५,२६७ समभाग होते. गुरुवारी त्याचे बाजारमूल्य सुमारे ३९,०७३ कोटी रुपये होते. सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात इन्फोसिसचे समभाग १० टक्क्यांहून अधिक घसरले. या घसरणीमुळे एलआयसीच्या इन्फोसिसमधील शेअर्सचे बाजारमूल्य ३५,१६६ कोटी रुपयांपर्यंत खाली आले. अशाप्रकारे भारतीय आयुर्विमा महामंडळाचे सुमारे ३९०७ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
मूर्ती कुटुंबाबद्दल बोलायचे झाले तर, नारायण मूर्ती यांचा मुलगा रोहन मूर्तीच्या शेअरचे बाजारमूल्य गुरुवारी ८,४४४.४७ कोटी रुपये होते. सोमवारी ते ७६०० कोटी रुपयांवर आले. त्यात ८४४ कोटी रुपयांची घट झाली. नारायण मूर्ती यांची मुलगी आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांच्याकडे बंगळुरूस्थित कंपनी इन्फोसिसमध्ये १.०७ टक्के हिस्सा आहे. गुरुवारी बाजार बंद होताना ज्याची किंमत ५४०९.५८ कोटी रुपये होती. सोमवारी सुरुवातीच्या व्यापारात तो ५४१ कोटी रुपयांनी घसरून ४८६८.६६ कोटी रुपयांवर आला.
नयनमूर्ती यांच्या पत्नी सुधा एन मूर्ती यांच्याकडे इन्फोसिसमध्ये ०.९५ टक्के हिस्सा आहे, ज्याचे बाजारमूल्य गुरुवारी ४७९७.६९ कोटी रुपये होते. सोमवारी ते ४८० कोटी रुपयांनी कमी होऊन ४३१७.९६ कोटी रुपयांवर आले. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्याकडे इन्फोसिसमध्ये ०.४६% हिस्सा आहे, ज्यांचे बाजारमूल्य शेअर्सच्या घसरणीमुळे सोमवारी २३२२.४१ कोटी रुपयांवरून २३१.१२ कोटी रुपयांनी घसरून २०८० कोटी रुपयांवर आले.
इन्फोसिसच्या शेअर्सने सोमवारच्या ट्रेडिंग सत्रात रु. १२४९.७५ च्या लोअर सर्किट लिमिटला स्पर्श केला आहे. यामुळे कंपनीचे बाजार भांडवल गेल्या गुरुवारच्या ५,७६,०६९ कोटी रुपयांवरून ५,१८,४६६ कोटी रुपयांवर आले आहे.
BSE Infosys Shares IT Company LIC Big Loss