शनिवार, मे 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेताच ऋषी सुनक यांनी केली अनेक मंत्र्यांची हकालपट्टी

by India Darpan
ऑक्टोबर 26, 2022 | 5:24 am
in संमिश्र वार्ता
0
Rishi Sunak e1666714296424

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर काही तासांतच ऋषी सुनक यांनी अनेक मंत्र्यांची हकालपट्टी केली आहे. मात्र, जेरेमी हंट हे ब्रिटनचे अर्थमंत्री म्हणून कायम राहणार आहेत. मंत्र्यांची हकालपट्टी होण्यापूर्वीच सुनक यांनी हे संकेत दिले होते. किंबहुना जुन्या लोकांनी केलेल्या चुका सुधारण्यासाठी आपली निवड झाल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. राजा चार्ल्स II याच्या भेटीनंतर तासाभरात सुनक यांनी आपले वचन पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. कोणताही विलंब न लावता ‘काम ताबडतोब सुरू होईल’, असे त्यांनी सांगितले होते.

सूत्रांनी सांगितले की त्यांनी माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांना त्यांच्या नवीन मंत्रिमंडळाच्या घोषणेपूर्वी राजीनामा देण्यास सांगितले आहे. आतापर्यंत तीन मंत्र्यांना पायउतार होण्यास सांगण्यात आले आहे. यामध्ये बिझनेस सेक्रेटरी जेकब रीस-मोग, जस्टिस सेक्रेटरी ब्रँडन लुईस आणि डेव्हलपमेंट मिनिस्टर विकी फोर्ड यांचा समावेश आहे, असे सूत्रांनी सांगितले. जेरेमी हंट अर्थमंत्री म्हणून कायम राहतील, असे अहवालात म्हटले आहे.

ब्रिटीश मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऋषी सुनक आपली नवीन शीर्ष टीम बनवण्यापूर्वी मंत्रिमंडळातील जुन्या लोकांना काढून टाकत आहेत. यामुळे जेकब रीस-मोग यांनी व्यवसाय मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, रीस-मॉग यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले जाईल हे आधीच माहीत होते, म्हणून त्यांनी राजीनामा पाठवला.

लिझ ट्रसच्या मंत्रिमंडळात काम केलेल्या किमान १० वरिष्ठ मंत्र्यांनी आज सरकार सोडले. रीस-मॉगसह बॅकबेंचवर परत आलेल्यांमध्ये ब्रँडन लुईस, वेंडी मॉर्टन, किट माल्थहाऊस आणि सायमन क्लार्क यांचा समावेश आहे. तथापि, सुनक यांना पाठींबा देत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. महाराजा चार्ल्स तिसरे यांची भेट घेतल्यानंतर सुनक यांनी भारतीय वंशाचे पहिले ब्रिटिश पंतप्रधान म्हणून औपचारिकपणे पदभार स्वीकारला आहे. पूर्वसुरींनी केलेल्या काही “चुका” सुधारण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. ब्रिटनचे माजी अर्थमंत्री सुनक (४२) हे हिंदू आहेत आणि ते गेल्या २१० वर्षांतील ब्रिटनचे सर्वात तरुण पंतप्रधान आहेत.

पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थान १० डाउनिंग स्ट्रीटच्या बाहेर, सुनक म्हणाले की ते देशासमोरील गंभीर आर्थिक संकटाला सहानुभूतीपूर्वक सामोरे जातील आणि “प्रामाणिक, व्यावसायिक आणि जबाबदार” सरकारचे नेतृत्व करतील. सुनक म्हणाले की, त्यांची पूर्ववर्ती लिझ ट्रस यांनी केलेल्या “चुका सुधारण्यासाठी” कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा नेता आणि पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे. ते काम तातडीने सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी ‘फर्लो’ सारख्या योजनांद्वारे “सामान्य माणसाचे आणि व्यवसायाचे रक्षण करण्यासाठी” सर्व काही केले. सुनक म्हणाले की, “आज आपल्यासमोर जी आव्हाने आहेत” त्यांना सामोरे जाण्याचा मी प्रयत्न करेन, असे ते म्हणाले.

I will unite our country, not with words, but with action.

I will work day in and day out to deliver for you.

Watch my speech from Downing Street ? pic.twitter.com/diOBuwBqXc

— Rishi Sunak (@RishiSunak) October 25, 2022

Britain New PM Rishi Sunak Action Ministers

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अंबानीच्या रिलायन्सची आता खेळणी बाजारात एण्ट्री; असा आहे कंपनीचा मेगाप्लॅन

Next Post

नियमित तुळशीची पाने खा आणि मिळवा एवढे सारे फायदे

Next Post
tulas

नियमित तुळशीची पाने खा आणि मिळवा एवढे सारे फायदे

ताज्या बातम्या

cbi

सीबीआयने १५ हजार रुपयांची लाच घेणा-या या बँकेच्या अधिकाऱ्याला केली अटक

मे 17, 2025
nagpur1 1024x696 1

पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार…. महसूल मंत्र्यांनी दिले निर्देश

मे 17, 2025
Untitled 32

ईडीची मोठी कारवाई…..या बांधकाम घोटाळयात ९ कोटीची कॅश, २३ कोटीचे दागिने व गुन्हेगारी कागदपत्रे जप्त

मे 17, 2025
crime 1111

वाहनचोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

मे 17, 2025
Maharashtra Police e1705145635707

राज्यातील १४ पोलीस अधीक्षकांना प्रमोशन…नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनाही पदोन्नती

मे 17, 2025
IMG 20250516 WA0348

वसंत व्याख्यान माला….ओबीसी आरक्षणाची लढाई अद्याप संपलेली नाही…माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

मे 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011