इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर काही तासांतच ऋषी सुनक यांनी अनेक मंत्र्यांची हकालपट्टी केली आहे. मात्र, जेरेमी हंट हे ब्रिटनचे अर्थमंत्री म्हणून कायम राहणार आहेत. मंत्र्यांची हकालपट्टी होण्यापूर्वीच सुनक यांनी हे संकेत दिले होते. किंबहुना जुन्या लोकांनी केलेल्या चुका सुधारण्यासाठी आपली निवड झाल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. राजा चार्ल्स II याच्या भेटीनंतर तासाभरात सुनक यांनी आपले वचन पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. कोणताही विलंब न लावता ‘काम ताबडतोब सुरू होईल’, असे त्यांनी सांगितले होते.
सूत्रांनी सांगितले की त्यांनी माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांना त्यांच्या नवीन मंत्रिमंडळाच्या घोषणेपूर्वी राजीनामा देण्यास सांगितले आहे. आतापर्यंत तीन मंत्र्यांना पायउतार होण्यास सांगण्यात आले आहे. यामध्ये बिझनेस सेक्रेटरी जेकब रीस-मोग, जस्टिस सेक्रेटरी ब्रँडन लुईस आणि डेव्हलपमेंट मिनिस्टर विकी फोर्ड यांचा समावेश आहे, असे सूत्रांनी सांगितले. जेरेमी हंट अर्थमंत्री म्हणून कायम राहतील, असे अहवालात म्हटले आहे.
ब्रिटीश मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऋषी सुनक आपली नवीन शीर्ष टीम बनवण्यापूर्वी मंत्रिमंडळातील जुन्या लोकांना काढून टाकत आहेत. यामुळे जेकब रीस-मोग यांनी व्यवसाय मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, रीस-मॉग यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले जाईल हे आधीच माहीत होते, म्हणून त्यांनी राजीनामा पाठवला.
लिझ ट्रसच्या मंत्रिमंडळात काम केलेल्या किमान १० वरिष्ठ मंत्र्यांनी आज सरकार सोडले. रीस-मॉगसह बॅकबेंचवर परत आलेल्यांमध्ये ब्रँडन लुईस, वेंडी मॉर्टन, किट माल्थहाऊस आणि सायमन क्लार्क यांचा समावेश आहे. तथापि, सुनक यांना पाठींबा देत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. महाराजा चार्ल्स तिसरे यांची भेट घेतल्यानंतर सुनक यांनी भारतीय वंशाचे पहिले ब्रिटिश पंतप्रधान म्हणून औपचारिकपणे पदभार स्वीकारला आहे. पूर्वसुरींनी केलेल्या काही “चुका” सुधारण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. ब्रिटनचे माजी अर्थमंत्री सुनक (४२) हे हिंदू आहेत आणि ते गेल्या २१० वर्षांतील ब्रिटनचे सर्वात तरुण पंतप्रधान आहेत.
पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थान १० डाउनिंग स्ट्रीटच्या बाहेर, सुनक म्हणाले की ते देशासमोरील गंभीर आर्थिक संकटाला सहानुभूतीपूर्वक सामोरे जातील आणि “प्रामाणिक, व्यावसायिक आणि जबाबदार” सरकारचे नेतृत्व करतील. सुनक म्हणाले की, त्यांची पूर्ववर्ती लिझ ट्रस यांनी केलेल्या “चुका सुधारण्यासाठी” कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा नेता आणि पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे. ते काम तातडीने सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी ‘फर्लो’ सारख्या योजनांद्वारे “सामान्य माणसाचे आणि व्यवसायाचे रक्षण करण्यासाठी” सर्व काही केले. सुनक म्हणाले की, “आज आपल्यासमोर जी आव्हाने आहेत” त्यांना सामोरे जाण्याचा मी प्रयत्न करेन, असे ते म्हणाले.
https://twitter.com/RishiSunak/status/1584892345715040258?s=20&t=h41mP3Bka3-gdW6yBm4CpQ
Britain New PM Rishi Sunak Action Ministers