इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रेमामध्ये जीव देण्याची भाषा नेहमीच बोलली जाते. चंद्र, तारे तोडून आणण्याची आश्वासने दिली जातात. आणाभाका घेत असतानाच प्रिय व्यक्तीसाठी जीव देणे आणि घेण्याचाही संकल्प व्यक्त होत असतो. मात्र, आपल्या प्रिय व्यक्तीलाच कारखाली ढकलून, चिरडून संपविण्याचा संतापजनक निर्दयी प्रकार पुढे आला आहे.
गर्लफ्रेंडला मारणाऱ्या आरोपीचे नाव झांग असे आहे. याने आपली गर्लफ्रेंड ‘वांग’ ला कारमधून खाली ढकलले आणि तीन वेळा चिरडले. हे दृश्य व्हिडिओमध्ये कैद झाले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी झांगने दुपारच्या सुमारास एका सार्वजनिक इनडोअर स्विमिंग पूलसमोर कारने महिलेला चिरडले. गर्लफ्रेंडवरील हल्ल्यानंतर तो रस्त्याच्या मधोमध तिला सोडून तेथून पळून गेला, पण नंतर पोलिसांनी त्याला अटक केली. अहवालानुसार, वांग हिला तातडीने उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले जेथे काही वेळाने तिला मृत घोषित करण्यात आले. या हल्ल्यामागील कारण दोघांमधील वाद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वाद कशावरून? पोलिस करताहेत तपास
नेमका कशावरून वाद झाला याचा अधिक तपास सुरू आहे. या घटनेनंतर चीनमधील लोकांनीही सरकारच्या धोरणांना शिव्या द्यायला सुरुवात केली. महिलांना सुरक्षेचे आश्वासन न देता येथील सरकार अधिक विवाह आणि जन्मदर वाढविण्याचा आग्रह धरत आहे, हे किती हास्यास्पद आहे, असे लोकांनी सांगितले.
boy friend killed girl friend car rash driving