मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि कायदा मंत्री किरेन रिजिजू यांना अपात्र ठरवावे, या मागणीसाठी वकीलांची संघटना असलेली बॉम्बे लॉयर्स असोसिएशन आक्रमक झाली आहे. असोसिएशनच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत म्हटले आहे की, धनखड आणि रिजिजू यांनी न्यायव्यवस्थेबाबतची अलीकडची विधाने भारतीय राज्यघटनेवरील अविश्वास दाखवतात. या प्रकरणात त्यांना अपात्र ठरविण्यात यावे.
बॉम्बे लॉयर्स असोसिएशनने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, उच्च न्यायालयाने उपराष्ट्रपती धनखड आणि कायदामंत्री रिजिजू यांना त्यांची अधिकृत कर्तव्ये पार पाडण्यापासून रोखावे. त्यांच्या सार्वजनिक वर्तनातून आणि त्यांच्या विधानांद्वारे दोघांनाही भारतीय संविधानावर विश्वास असल्याचे जाहीर करावे, अशी मागणी केली आहे. बुद्धिमत्तेचा अभाव दाखवून त्यांना घटनात्मक पदावर राहण्यास अपात्र ठरवले जावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
न्यायव्यवस्थेबाबत दोघांच्या नुकत्याच झालेल्या वक्तव्यांमुळे भारताच्या राज्यघटनेवरचा अविश्वास दिसून येतो. अशा स्थितीत त्यांना संबंधित पदावरून बडतर्फ करणे आवश्यक आहे, असे असोसिएशनचे म्हणणे आहे.
https://twitter.com/LiveLawIndia/status/1620796106023256064?s=20&t=EkPtKK09BTgU_QNZ8wdcwg
Bombay Lawyers Association Vice President and Law Minister High Court