मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोठ्या पडद्यावर नुकताच प्रदर्शित झालेला अभिनेता अमीर खानचा चित्रपट ‘लाल सिंग चड्डा’ हा बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला आहे. चित्रपटाच्या आगमनापूर्वीच तो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या चित्रपटाविरोधात सोशल मिडीवर आंदोलन छेडण्यात आले होते. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर चित्रपट सपशेल आपटला आहे. यानंतर अभिनेता आणि चित्रपटाचा निर्माता असलेला अमीर खान याच्या पुढे संकटाची मालिका उभी राहिली आहे. चित्रपट फ्लॉप झाल्याने वितरकांनी निर्मात्यांकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
लाल सिंह चड्डा हा बहुप्रतीक्षित चित्रपट होता. परंतु, आमीर आणि करिना यांच्या वक्तव्यामुळं सोशल मीडियानं बहिष्कार अभियान चालविलं. त्याचा परिणाम बॉक्स ऑफिसवर दिसला. १८० कोटी बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट पहिल्या आठवड्यात जेमतेम ३८ कोटी रुपयांची कमाई करू शकला आहे. ‘लाल सिंह चड्डा’ या चित्रपटाने रविवारी १० कोटी रुपयांचा व्यवसाय केला. त्यापूर्वी शनिवारी ८ कोटी ७५ लाख, शुक्रवारी ७ कोटी २६ लाख आणि गुरुवारी ११ कोटी ७० लाखांचा व्यवसाय केला. तर आता हा चित्रपट नीट उभा राहण्याची शक्यता मावळली आहे.
या चित्रपटावरून दिल्लीतील वकिलाने पोलीस आयुक्त संजय अरोडा यांच्याकडं आमीर खान आणि अन्य जणांविरुद्ध तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार आमीर खान यांनी ‘लाल सिंह चड्डा’ चित्रपटातून भारतीय सेनेचा तसेच हिंदू समाजाचा अपमान केला आहे. या चित्रपटात आपत्तीजनक दृश्य असल्याचंही वकील विनीत जिंदल यांनी तक्रारीत म्हटलं आहे. आमीर खान, पॅरामाऊंट पिक्चर्स आणि चित्रपट निर्माता अद्वैत चंदन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तेव्हा या संकटाना आता अमीर खान कसा सामोरा जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Bollywood Lal Singh Chaddha Movie Hit or Flop
Aamir Khan Film Loss Distributor