इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सिनेसृष्टी ही आपल्या रोजच्या आयुष्यापेक्षा वेगळी असून ते जग खूप निराळे आहे. कलाकारांचे आयुष्य आणि दिनचर्या देखील वेगळी असून त्याबाबत अनेकदा वेगवेगळ्या चर्चा होत असतात. सध्या अशाच एका कलाकाराच्या वक्तव्याची चर्चा होताना दिसत आहे. शरीरसंबंधांबाबत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने केलेल्या प्रामाणिक वक्तव्यावर त्याच्या चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे.
बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. कियारा आडवाणीशी असलेल्या त्याच्या नात्यामुळे तो नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो. सिद्धार्थ मल्होत्रा आणि विकी कौशल यांनी नुकतीच करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये दोघांनीही त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले. पण यावेळी सिद्धार्थने शरीरसंबंधांबाबत केलेलं एक वक्तव्य बरंच चर्चेत आहे. सिद्धार्थ मल्होत्राने या शोमध्ये त्याच्या आणि कियारा आडवाणीच्या नात्याबाबत हिंट तर दिलीच पण प्रेम आणि शरीरसंबंध या दोन्ही गोष्टी कशाप्रकारे एकमेकांत गुंतलेल्या आहेत यावरही भाष्य केलं.
या एपिसोडमध्ये सिद्धार्थ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या हटके पंजाबी स्टाइलमध्ये त्यांच्या खासगी आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. करण जोहर त्याच्या शोमध्ये येणाऱ्या सर्वच पाहुण्यांना त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारताना दिसतो. यावेळी त्याने विकी कौशलला आणखी एक कमेंट वाचून दाखवली. ती अशी होती की, “विकी कौशल इतर अभिनेत्यांच्या तुलनेत कमी सेक्शुअल आहे.” करणच्या या कमेंटवर सिद्धार्थने लगेच प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “सेक्शुअल होण्यासाठी प्रेमदेखील गरजेचं आहे. प्रेम नसेल तर सेक्स करणं म्हणजे प्रामाणिक नसल्यासारखं आहे.” सिद्धार्थच्या या वक्तव्यानं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावर त्याचं कौतुक होताना दिसत आहे.
Bollywood Actor Siddhartha Malhotra on Sex Relation
Coffee With Karan