इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सलमान खान हा आजही बॉलीवूडमधील सर्वात हॉट अभिनेता आहे. बॉलीवूडमध्ये टॉपच्या अभिनेत्यांमध्ये त्याचा आजही समावेश होतो. सलमान खान हा आपल्या फिजीकसह दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. वर्षभरात एखादाच चित्रपट करणारा सल्लूभाईच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. याशिवाय तो आपल्या खासगी आयुष्यासाठी देखील चर्चेत असतो. सलमान खानचे अजूनही शुभमंगल झालेले नाही. आजवर त्याचे अनेक अभिनेत्रींशी नाव जोडले गेले. सध्या सलमान खानचे नाव अभिनेत्री पूजा हेगडेसोबत जोडले गेले आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
पूजा हेगडे हे नाव सर्वाना परिचयाचं आहे. मनोरंजन विश्वात पूजाने आपले पाय घट्ट रोवले आहेत. अभिनेत्री म्हणून तिने बॉलीवूडमध्ये दमदार एन्ट्री केली. मात्र दाक्षिणात्य सिनेसृष्टीपासूनचा तिचा बॉलीवूडपर्यंतचा प्रवास सहज नव्हता. एका जाहिरातीमुळे तिला बॉलीवूडमध्ये एंट्री मिळाली आहे. हे ऐकून साहजिकच तुम्हाला आश्चर्य वाटेल. पूजा हेगडेला दाक्षिणात्य चित्रपटात काम मिळाले होते. मात्र बॉलीवूडमध्ये तिला संधी मिळत नव्हती. याचदरम्यान दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर हे त्यांच्या चित्रपटासाठी एका नायिकेचा शोध घेत होते. त्याचवेळी त्यांच्या बायकोने टीव्हीवर एका जाहिरातीत पूजा हेगडेला पहिले आणि गोवारीकर यांचा शोध संपला. पूजाचा बॉलीवूडमधला मार्ग मोकळा झाला.
पूजा हेगडे सध्या तिच्या ‘सर्कस’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याचदरम्यान अचानक पूजा आणि सलमानच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ट्रेड अॅनालिस्ट उमैर संधू याच्या एका ट्विटने बॉलिवूड आणि सिनेप्रेमींना हैराण केलं आहे. सलमान आणि पूजा हेगडे रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा त्याने ट्विटमध्ये केला आहे. ‘ब्रेकिंग न्यूज…टाऊनमध्ये नवं कपल आलं आहे. मेगास्टार सलमान खान पूजा हेगडेच्या प्रेमात पडला आहे. सलमानच्या प्रॉडक्शन हाऊसने पूजाला पुढच्या २ सिनेमांसाठी साईन केलं आहे. हे दोघं सध्या एकमेकांसोबत बराच वेळ घालवत आहेत. सलमानच्या जवळच्या सूत्रांनी ही गोष्ट सांगितली आहे,’ अशा आशयाचं ट्विट उमैर संधूने केलं आहे. आता या ट्विटमध्ये किती सत्य आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. पण या ट्विटमुळे चांगल्याच अफवा पसरल्या आहेत.
सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या सिनेमात सलमानसोबत पूजा हेगडे लीड रोलमध्ये आहे. कदाचित या आगामी सिनेमामुळे सलमान व पूजाच्या अफेअरच्या अफवांना हवा दिली जात असेल. आता खरं काय? हे लवकर कळेलच.
https://twitter.com/UmairSandu/status/1600452575123279879?s=20&t=Djs5Cgq-RZoyewsWJs8DAQ
Bollywood Actor Salman Khan Dating Viral Affair
Actress Pooja Hegde