इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – काही काही चित्रपट हे त्या – त्या कलाकारांची ओळख बनतात. बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान हा जसा त्याच्या रोमँटिक चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे, तसाच तो त्याच्या खलनायक भूमिकांसाठी देखील प्रसिद्ध आहे. ‘बाजीगर’ हा नकारात्मक भूमिकेचा त्याचा कदाचित पहिला चित्रपट. आजही तो चित्रपट रसिकांच्या लक्षात आहे. पण, आता एक नवीनच आणि इंटरेस्टिंग माहिती समोर आली आहे.
बॉलीवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान याला १९९३ मध्ये आलेल्या ‘बाजीगर’साठी सलमानला विचारण्यात आलं होतं. मात्र, सलमानला यात काही बदल हवे होते आणि यामुळेच त्याने चित्रपट करण्यास साफ नकार दिला होता. अभिनेत्याने नकार दिल्यानंतर या चित्रपटात विकी मल्होत्राची भूमिका शाहरुख खानने साकारली आणि इतिहास रचला.
या चित्रपटाने शाहरुखच्या करिअरला एक वेगळीच दिशा मिळाली. या चित्रपटाबाबत सलमानचे वडील आणि ज्येष्ठ लेखक सलीम खान यांनी एक सल्ला दिला होता. ‘बाजीगर’मधील व्यक्तिरेखा निगेटिव्ह होती, त्यामुळे त्यात काही महत्त्वाचा बदल त्यांनी अब्बास मस्तान यांना सुचवला होता, पण ते मात्र हा बदल करण्यास तयार नव्हते. सलीम खान यांच्या म्हणण्यानुसार या कथानकात तेव्हा एका आईची भूमिका हवी होती आणि सलमानने हे अब्बास मस्तान यांना सांगितलं होतं, पण नंतर सलमाननेच या चित्रपटाला नकार दिला.
सलमानने ‘द कपिल शर्मा शो’च्या मंचावर याबद्दल खुलासा केला होता. सलमान म्हणतो, “मला बाजीगरची कथा आवडली होती, त्यात फक्त मी आणि माझ्या वडिलांनी आईचे पात्र घ्यायचा सल्ला दिला होता, अब्बास मस्तान यांना प्रथम ही गोष्ट खटकली. आणि त्यानंतर आम्ही पण त्या चित्रपटाचा नाद सोडला, शाहरुख खानने तो चित्रपट केला आणि नंतर आम्हाला अब्बास मस्तान यांचा फोन आला. तेव्हा त्यांनी आम्ही दिलेल्या सल्ल्याबद्दल आमचे आभार मानले. त्याप्रमाणे कथानकात बदल केले.”
शाहरुखने ‘बाजीगर’ चित्रपटात विकी मल्होत्राची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याचं खूप कौतुक झालं. या चित्रपटात त्याच्याशिवाय बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि काजोल देखील मुख्य भूमिकेत होत्या. ९० च्या दशकात शाहरुख ‘डर’ आणि ‘अंजाम’ तसेच ‘बाजीगर’ या चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिकेत दिसला होता. सलमान आणि शाहरुख यांना ‘पठाण’मध्ये एकत्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना खूप वर्षांनी मिळाली.
Bollywood Actor Salman Khan Bajigar Film Offer