मुंबई – सलमान खान त्याच्या चित्रपट करियरसोबतच वैयक्तिक आयुष्यबद्दलही नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या लोकप्रियतेमुळे त्याच्या आयुष्यातील छोट्यातील छोटी गोष्टही त्याच्या चाहत्यांना जाणून घ्यायची असते. आजवर त्याच्या अफेअर्सची बरीच चर्चा झाली. पण तुम्हाला माहीत आहे का, कधी काळी सलमानने जुही चावलाला देखील मागणी घातली होती. तिच्या वडिलांनी मात्र याला नकार दिला होता.
सलमान खानने एका मुलाखतीत म्हटले होते, जुही खूप छान आणि निरागस आहे. मी तिच्या वडिलांना भेटलो होतो, पण बहुधा त्यांना मी आवडलो नाही. त्यांना काय हवे होते, हे मला कळले नाही. आपल्या संपूर्ण करियरमध्ये जुही चावलाचे नाव कधीच कोणत्याच अभिनेत्यासोबत जोडले गेले नाही. १९९२ मध्ये तिची भेट व्यावसायिक जय मेहता यांच्यासोबत झाली. जय मेहता विवाहित होते पण एका विमान अपघातात त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. याच काळात आई गेल्याने जुही देखील अस्वस्थ होती. तेंव्हा जय मेहतांनीच तिला आधार दिला. यातूनच १९९५ मध्ये या दोघांनी लग्न केले. त्यांना २ मुले आहेत.