मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलीवूड मधील कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. त्यांच्याकडे किती पैसा आहे, कुणाकडे कोणते घर आहे याची देखील चर्चा होत असते. सध्या देखील एका अभिनेत्याच्या घराबद्दल अशी चर्चा सुरू आहे. आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ठसा उमटवणारा अभिनेता राजकुमार राव याने मुंबईत एक नवीन आलिशान अपार्टमेंट विकत घेतले आहे. राजकुमारने त्याची सहकलाकार अभिनेत्री जान्हवी कपूरकडून हे आलिशान अपार्टमेंट विकत घेतले आहे.
आपल्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यासाठी प्रसिद्धी मिळवणाऱ्या राजकुमार राव यांनी अलीकडेच जुहू, मुंबई येथे एक आलिशान ट्रिपलेक्स अपार्टमेंट खरेदी केले आहे. राजकुमार रावने हे घर अभिनेत्री जान्हवी कपूरकडून 44 कोटी रुपयांना घेतले आहे. हा आलिशान फ्लॅट 3456 स्क्वेअर फूट परिसरात पसरलेला आहे. एका अहवालात दावा केला जात आहे की, ही डील देशातील सर्वात महागडी डीलपैकी एक आहे. हा फ्लॅट खरेदी करून राजकुमार राव खूप खूश आहेत, तर जान्हवीला या डीलचा खूप फायदा झाल्याचा दावा रिपोर्टमध्ये केला जात आहे. जान्हवी कपूरने हा फ्लॅट 2020 मध्ये सुमारे 39 कोटी रुपयांना खरेदी केला होता. म्हणजेच पाच कोटी रुपयांच्या या डीलचा फायदा जान्हवीलाही झाला आहे. राजकुमार राव, लोटस आर्य यांच्या या फ्लॅटची इमारत निर्माते आनंद पंडित यांनी बनवली आहे.
राजकुमार आणि त्यांची पत्नी पत्रलेखा यांनी जान्हवीकडून 14वा, 15वा आणि 16वा मजला घेतला आहे आणि इमारतीचा 11वा आणि 12वा मजला आधीच त्यांच्या नावावर आहे. 3456 स्क्वेअर फूटाचे हे घर जान्हवीने खरेदी केलं होतं. इतक्या कमी वयात कोट्यवधी रूपयांची प्रॉपर्टी खरेदी करून जान्हवी चर्चेत आली होती. आता तिने हेच अपार्टमेंट राजकुमार व त्याची पत्नी पत्रलेखाला विकलं आहे. राजकुमार पत्नी पत्रलेखासोबत लवकरच या घरात शिफ्ट होणार आहे.
जान्हवी कपूर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘गुड लक जेरी’ या चित्रपटासाठी चर्चेत आहे, तर राजकुमार रावचा ‘हिट: द फर्स्ट केस’ हा चित्रपट खूपच फ्लॉप झाला आहे. याशिवाय राजकुमार ‘मिस्टर अँड मिसेस माही’, ‘भिडे’, ‘सेकंड इनिंग’, ‘गन्स अँड गुलाब्स’, श्रीकांत भोलाचा बायोपिक आणि ‘स्वागत है’ या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.
गेल्या काही दिवसांत अनेक बॉलिवूड स्टार्सने नवी प्रॉपर्टी खरेदी केली. रणवीर सिंग वांद्रे भागात नवा बंगला खरेदी केला आहे. त्याच्या बंगल्याची किंमत जवळपास 119 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे. अभिनेत्री काजोलने देखील मुंबईत दोन नवे फ्लॅट खरेदी केले आहेत. विशेष म्हणजे काजोलने खरेदी केलेले हे फ्लॅट राजकुमार राव राहात असलेल्या बिल्डिंगमध्ये आहेत.
Bollywood Actor Rajkumar Rao buy new Home