बुलढाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भ्रष्टाचाराची कीड किती खोलवर रुजली आहे, याचा प्रत्यय सध्या एका व्हायरल व्हिडिओमधून येत आहे. जिल्ह्यातील डोणगावच्या ग्रामविकास अधिकाऱ्याने चक्क भ्रष्टाचार कसा करायचा याचे धडे दिले. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात व्हायरल झाला आहे. याद्वारेच ग्रामीण भागात नक्की कसे काम चालते याची झलकही मिळत आहे. तसेच, नेटकऱ्यांकडून यावर सध्या कमेंटचा पाऊस पडत आहे.
व्हिडिओमध्ये जो संवाद होतो आहे तो असा, होय, हा ग्रामविकास अधिकारी व्हिडीओमध्ये पैसे खाणे हा तुम्हाला बहाल केलेला अधिकार असल्याचे म्हणतो. पैसे खाणे हा तुम्हाला बहाल केलेला अधिकार आहे. असे ग्रामविकास अधिकारीच महिला सरपंचाला धडे देत आहे. मेहकर तालुक्यातील डोणगाव ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी, लिपिक आणि महिला सरपंचाच्या वार्तालापाचा हा व्हिडिओ आहे. ग्रामविकास अधिकारी आणि लिपिक हे महिला सरपंचाला पैसे कसे खायचे?, ते धडे देताना दिसत आहेत.
डोणगाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर चणखोरे हे नेहमीच या ना त्या कारणाने वादग्रस्त ठरलेले आहेत. त्यांच्याविषयी अनेकांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. मात्र ग्रामविकास अधिकारी चनखोरेंवर राजकीय आशीर्वाद असल्याने त्यांच्यावर अद्यापही कारवाई झाली नाही. त्यातच आता या ग्रामविकास अधिकारी, लिपिक आणि महिला सरपंच यांच्या वार्तालापाचा व्हिडिओ समोर आला आहे..
या व्हिडिओमध्ये ग्रामविकास अधिकारीच महिला सरपंच रेखा पांडव यांना पैसे कैसे खायचे? ते धडे देताना दिसतात.
जनता ही चोर असून चोरांनी पैसे घेऊन मतदान केले. त्यामुळे पावसाळा आला की डोळे, कान बंद करुन टाकायचे. जसे जळलं तसे जळू द्यायचे, असा सल्लाही ग्रामविकास अधिकारी चनखोरे सरपंचाला देतो. इतकेच पैसे खाणे हा तुम्हाला बहाल केलेला अधिकार असल्याचे ही ग्रामविकास अधिकारी सरपंचाला सांगत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतमध्ये अनेक कामांत भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आणि सरपंचावर चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ चरण आखाडे यांनी केली.
https://twitter.com/GovindHatwar/status/1564657245983371264?s=20&t=Tq2ipvUzPLfDbPNnLRvYFA
Block Development Officer Corruption Dialogue Video