मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अहमदाबादमधल्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स, DVR सापडला…गूढ उलगडणार

by India Darpan
जून 14, 2025 | 6:29 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
GtTIu6WXsAAPqDd e1749862727672

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अहमदाबादमध्ये काल कोसळलेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स, DVR शुक्रवारी सापडला आहे. अपघाता मागील कारणं शोधण्यात या दोन उपकरणाची भूमिका महत्त्वाची असणार आहे. ब्लॅक बॅाक्स डेटा रेकॅार्ड करण्याचं काम करतात. तर डीव्हीआर सामान्यपणे सुरक्षा कॅमे-यांनी फ्लाईटचा व्हिडिओ रेकॅार्ड करतो.
दरम्यान अपघाताच्या पार्श्वभूमीवर Genx इंजिन असलेल्या बोइंग 787 विमानांची अतिरीक्त सुरक्षा चाचणी करण्याचे निर्देश हवाई वाहतूक महासंचालकांनी एअर इंडियाला दिले आहेत. अपघात स्थळावर आजही तपास आणि मदतकार्य सुरू आहे. न्यायवैद्यक तज्ञांनी अपघातस्थळी भेट देऊन सविस्तर तपासणी केली.

विमान दुर्घटनेचं नेमकं कारण अजून पर्यंत कळू शकलेलं नाही. या प्रकरणी मेघनी पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली. विविध सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी घटनास्थळी तपास करत आहेत. गुजरात एटीएसनं घटनास्थळावरून डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे. विमान पडलं त्या भागातल्या बेपत्ता असलेल्या स्थानिक नागरिकांचाही शोध सुरू आहे.

या विमानातल्या २४२ पैकी २४१ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं एअर इंडियानं आज जाहीर केलं. मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रुपाणी कुटुंबाची भेट घेऊन शोक व्यक्त केला . त्यापूर्वी त्यांनी अहमदाबाद सरकारी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. अपघातातून बचावलेले विमान प्रवासी रमेश विश्वासकुमार यांच्याशीही त्यांनी संवाद साधला.

दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या मृतदेहांची डीएनएच्या मदतीने ओळख पटवण्याचं काम सुरू असून, ओळख पटलेले मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबांकडे सुपूर्द केले जात आहेत. आतापर्यंत ७ मृतदेह संबंधित कुटुंबांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. अहमदाबादच्या सरकारी रुग्णालयात सध्या ३२ जणांवर उपचार सुरू असून गंभीररीत्या होरपळलेले काही रुग्ण वगळता अन्य सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राकेश जोशी यांनी दिली आहे. दुर्घटनेतल्या जखमींचे प्राण वाचवण्याच्या आशेनं अनेक जण रक्तदान करण्यासाठी मोठ्या संख्येनं पुढाकार घेत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भरदिवसा घरफोडी, चोरट्यांनी अडीच लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला

Next Post

मोबाईल ग्राहकांना प्रीपेडमधून पोस्टपेड किंवा पोस्टपेडमधून प्रीपेडमध्ये बदलणं सोपं जाणार

Next Post
Untitled 36

मोबाईल ग्राहकांना प्रीपेडमधून पोस्टपेड किंवा पोस्टपेडमधून प्रीपेडमध्ये बदलणं सोपं जाणार

ताज्या बातम्या

Untitled 46

नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची पहिली बैठक…झाले हे निर्णय

जून 17, 2025
rohini khadse e1712517931481

समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक, लुटमार करण्याच्या घटना…रोहिणी खडसे यांनी व्हिडिओ शेअर करत केले ट्विट

जून 17, 2025
WhatsApp Image 2025 06 16 at 7.32.53 PM 1920x1280 1

नवीन शैक्षणिक वर्ष प्रारंभ…पहिल्या दिवशी या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

जून 17, 2025
Gtj2vdeWgAA7QAN 1920x1440 1 e1750112697963

मुंबईत वॉटर मेट्रो…तीन महिन्याच्या आत आराखडा सादर करण्याच्या सूचना

जून 17, 2025
Untitled 45

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करण्यासाठी या तारखेपर्यंत अंतिम मुदतवाढ…

जून 17, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर कारवाई? परिवहन आयुक्तांनी काढले हे परिपत्रक

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011