गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भारतीय जैन संघटनेतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींसाठी पुणे येथे निवास, भोजन आणि शिक्षणाची मोफत संधी

by Gautam Sancheti
मे 19, 2025 | 7:17 pm
in संमिश्र वार्ता
0
BJS

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतीय जैन संघटना (बीजेएस) यांच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही, महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींना शैक्षणिक वर्ष २०२५–२०२६ मध्ये प्रवेश देऊन १२वी पर्यंतचे शिक्षण वाघोली पुणे येथे पूर्णतः मोफत दिले जाणार आहे. तसेच भोजन, निवास, वैद्यकीय व इत्यादी सुविधा शिक्षण पूर्ण होण्यापर्यंत मोफत उपलब्ध करण्यात येतील. यासाठी इयत्ता ५ वी व ६ वी मध्ये १०० मुला – मुलींना प्रवेश देण्यात येणार असून, दिनांक ७ जून २०२५ पर्यंत अर्ज वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प, पुणे-नगर रोड, बकुरी फाटा, पुणे येथे सादर करण्यात यावे. या साठी आवश्यक कागदपत्र व पालकांचे संमती पत्र अनिवार्य असून, इतर माहिती साठी बीजेएस प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंके – ९४२३ ०७४ २३४, वस्तीगृह व्यवस्थापक, साईनाथ रापतवार – ९९७० ००१ ०११, प्रमुख अधीक्षक, रामदास औटे – ९४२० ७८६ २१२, आणि सौ. सविता सुतार – ९८६० १०५ ३२६ यांच्याशी संपर्क साधावा.

बीजेएसचे संस्थापक श्री. शांतिलालजी मुथ्था हे गेली ४० वर्षांपासून अशा प्रकारचे सामाजिक कार्य करीत आहेत. लातूर भूकंपातून १२०० मुलांना पुणे येथे आणून त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी या कार्याची सुरुवात केली होती. १९९७ सालापासून मेळघाट परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांना पुणे येथे शिक्षणासाठी आणून त्यांना शिक्षणाबरोबरच सक्षम नागरिक बनविण्यामध्ये बीजेएसने यश मिळवले आहे. आत्तापर्यंत ३००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पुनर्वसन बीजेएसने केले असून, या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी पिढीचे चेंज एजंट बनविण्यामध्ये बीजेएसला यश प्राप्त झाले आहे. आज आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुला-मुलीना ही सुविधा प्राप्त करून देण्यासाठी बीजेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर साखला, मॅनेजिंग डायरेक्टर कोमल जैन सह संपूर्ण बीजेएसची टीम कार्यरत आहे.

संबंधितांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन बीजेएस राज्याध्यक्ष केतन भाई शहा व राज्य महामंत्री प्रवीण पारख यांनी केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुणे- नाशिक थेट रेल्वे मार्गाचा हा प्रस्ताव तातडीने फेटाळण्याची मागणी….भुजबळ यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

Next Post

पुणे-नाशिक महामार्गावर टाटा.इव्ही मेगाचार्जर सुरू…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
TATA.ev 1

पुणे-नाशिक महामार्गावर टाटा.इव्ही मेगाचार्जर सुरू…

ताज्या बातम्या

jail11

ठाणे येथे ४७ कोटी ३२ लाखाच्या बनावट आयटीसी फसवणूक प्रकरणात मुख्य सूत्रधाराला अटक

ऑगस्ट 21, 2025
Untitled 35

बेस्ट निवडणुकीच्या पराभवानंतर राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला..नेमकी काय चर्चा झाली?

ऑगस्ट 21, 2025
amit shah 1

भ्रष्टाचारी व्यक्तींचे संरक्षण करण्यासाठी विरोधी पक्षांच्या आघाडीचे असभ्य वर्तन….लोकसभेतील गोंधळावर अमित शाह कडाडले

ऑगस्ट 21, 2025
crime 13

जळगावमध्ये शेतजमिनीत विजेच्या धक्क्याने मृत्यू पावलेले पाचही जण मध्यप्रदेशातील

ऑगस्ट 21, 2025
Chandrashekhar Bawankule

सणासुदीच्या काळात जनतेची घरे पाडू नका….महसूलमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

ऑगस्ट 21, 2025
WhatsApp Image 2025 08 20 at 8.02.28 PM 1 1

पुण्यात या ठिकाणी २७७ कोटीचे दुमजली उड्डाणपुल…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

ऑगस्ट 21, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011