शनिवार, जुलै 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पुणे-नाशिक महामार्गावर टाटा.इव्ही मेगाचार्जर सुरू…

by Gautam Sancheti
मे 19, 2025 | 7:28 pm
in संमिश्र वार्ता
0
TATA.ev 1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतातील सर्वात मोठा चार–चाकी इव्ही उत्पादक आणि भारतातील इव्ही क्रांतीत अग्रेसर असलेल्या टाटा.इव्ही ने आज पुणे-नाशिक महामार्गावर आपल्या टाटा.इव्ही मेगाचार्जरचे उद्घाटन करून इव्ही समुदायाचा चार्जिंगचा अनुभव सुधारण्याच्या दिशेने एक लक्षणीय पाऊल उचलले. या कंपनीने फेब्रुवारी २०२५ मध्ये खुला सहयोग २.०फ्रेमवर्क अंतर्गत भारतातील सध्याचे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर २०२७ पर्यंत दुप्पट करून ४००,००० चार्जिंग पॉईंट्सपर्यंत वाढविण्याचा आपला जो उपक्रम जाहीर केला होता, त्याच्याशी सुसंगत ही घडामोड आहे. दृष्टिक्षेपात चार्जर असणे, चार्जिंगची जलद गती आणि विश्वासार्हता याबाबत इव्ही मालकांच्या मनात असलेल्या चिंतेचे निराकरण करण्यासाठी टाटा.इव्ही ने देशभरात उच्च-गतीच्या, विश्वसनीय चार्जिंग स्टेशन्सचे को-ब्रॅंडेड टाटा.इव्ही मेगाचार्जर नेटवर्क उभारण्यासाठी चार्जझोनशी भागीदारी केली आहे. या टाटा.इव्ही मेगाचार्जर्सचा उपयोग सर्व इव्हीs करू शकतील, पण टाटा इव्ही च्या वापरकर्त्यांना काही विशेष लाभ मिळतील, जसे की चार्जिंग पॉइंटवर प्राधान्याने प्रवेश मिळेल आणि चार्जिंग दरावर २५% पर्यंत सूट मिळेल.

पुणे-नाशिक महामार्गावरील आकाश मिसळ हाऊस हे या गजबजलेल्या मार्गावर इव्ही प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि उल्लेखनीय चार्जिंग स्टेशन आहे. पुण्यापासून ६० किमी आणि नाशिकपासून १६० किमी अंतरावर असलेले, चार्ज झोन द्वारा संचालित हे टाटा.इव्ही मेगाचार्जर झटपट चार्जिंगची गरज असणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी एक सोयिस्कर आणि विश्वासार्ह स्टॉप प्रदान करते. १२०केडब्ल्यू चार्जिंग क्षमता आणि ४ समर्पित पार्किंग बे असलेले हे स्टेशन कार्यक्षम सेवा सुनिश्चित करते आणि जास्त प्रतीक्षा न करता अनेक वाहने येथे उभी राहू शकतात. आकाश मिसळ हाऊस हे येथील चविष्ट मिसळ पाव आणि प्रसन्न वातावरणाबद्दल ओळखले जाते. त्यामुळे तुमच्या गाडीला आणि तुम्हालाही रीचार्ज करण्यासाठी ही अगदी योग्य जागा आहे. जलद चार्जिंगबरोबरच प्रवासी येथील स्वच्छतागृहे आणि आरामशीर बसण्याच्या सुविधांचा देखील लाभ घेऊ शकतात. त्यामुळे ही छोटीशी विश्रांती तुम्हाला आराम देखील देऊन जाईल. पुणे आणि नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्या इव्ही मालकांसाठी आकाश मिसळ हाऊस एक महत्त्वाचा दुवा बनला आहे, जो सुविधा आणि आराम दोन्ही प्रदान करतो.

टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि. आणि टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लि. चे चीफ स्ट्रॅटजी ऑफिसर बालाजी राजन म्हणाले, “पुणे-नाशिक महामार्गावर आकाश मिसळ हाऊस येथे आमच्या टाटा.इव्ही मेगाचार्जरचे उद्घाटन झाल्यामुळे या मार्गावरील विश्वसनीय चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरची गरज भागली आहे. ४ समर्पित पार्किंग बे असलेली ही १२०केडब्ल्यू जलद चार्जिंग सुविधा महाराष्ट्रातील या महत्त्वाच्या शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या इव्ही मालकांसाठी अत्यंत सोयिस्कर झाली आहे. या चार्जिंग स्टॉपवर प्रवाशांना स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेता येतो आणि त्यांची इव्ही झटपट चार्ज होत असताना त्यांना एक आरामदायक आणि आल्हाददायक विश्रांती देखील मिळते. हा उपक्रम महाराष्ट्रात लांब अंतराचा इव्ही प्रवास त्रास-मुक्त आणि सुकर बनवण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बळकटी देतो.”

चार्ज झोनचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि मॅनिजिंग डायरेक्टर श्री. कार्तिकेय हरियाणी म्हणाले, “टाटा.इव्ही च्या भागीदारीत एनएच४८ वर आमच्या पहिल्या को-ब्रॅंडेड सुपरचार्जिंग स्टेशनचे उद्घाटन करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. सदर राष्ट्रीय महामार्गावर हे सुपरचार्जिंग स्टेशन मोक्याच्या स्थानी स्थित आहे. जलद, विश्वसनीय आणि सहज प्राप्य सोल्यूशन्स मिळावी या आजच्या इव्ही चालकांच्या गरजेवर लक्ष केंद्रित करून आम्ही चार्ज झोन आणि टाटा.इव्ही मिळून भारतात इव्ही चार्जिंगच्या कक्षा रुंदावत आहोत. आम्ही एक अशी निर्बाध इव्ही ईकोसिस्टम उभारत आहोत, जी ऑटो चार्ज, आरएफआयडी टॅप आणि चार्ज सारख्या नावीन्यपूर्ण फीचर्सना समर्थन देते आणि ही फीचर्स सध्याची मागणी आणि मोबिलिटीच्या भावी गरजा पूर्ण करणारी आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारतीय जैन संघटनेतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींसाठी पुणे येथे निवास, भोजन आणि शिक्षणाची मोफत संधी

Next Post

शेतकऱ्यांना सी-बिलची अट न घालता कर्ज पुरवठा करा…कृषी कर्ज पुरवठ्यावरून मुख्यमंत्र्यांनी दिली बँकांना ताकीद

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
agri news 3 1024x515 1

शेतकऱ्यांना सी-बिलची अट न घालता कर्ज पुरवठा करा…कृषी कर्ज पुरवठ्यावरून मुख्यमंत्र्यांनी दिली बँकांना ताकीद

ताज्या बातम्या

FB IMG 1752846260760 e1752852606921

नाशिक शहरात खड्डेमुक्तीसाठी विशेष मोहीम…आयुक्त मनिषा खत्री यांनी पाहणी करुन दिले हे निर्देश

जुलै 18, 2025
NMC Nashik 1

नाशिक पाणीपुरवठा पाईपलाईन कामाची विभागीय आयुक्त यांच्यामार्फत होणार चौकशी

जुलै 18, 2025
VPE1 1024x515 1

दिव्यांगांसाठीच्या अनुदानात १००० रुपयांची वाढ….आता मिळणार इतके पैसे

जुलै 18, 2025
vidhanbhavan

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव बदलणार…केंद्र शासनाकडे शिफारस

जुलै 18, 2025
WhatsApp Image 2025 07 11 at 12.04.24 PM 7 1024x512 1

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातील १०० कोटी रुपयांचा गैरव्यवहाराची सखोल चौकशी होणार…

जुलै 18, 2025
accident 11

दोन दुचाकींच्या धडकेत जखमी झालेल्या ६६ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू

जुलै 18, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011