नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले आहे. राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय जोशपूर्ण भाषण करताना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उत्तेजित केले. तसेच, भाजपने याप्रसंगी नव्या अभियानाची घोषणा केली आहे. महाविजय हे अभियान भाजपच्यावतीने आता राबविले जाणार आहे. त्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर होणारी विधानसभा निवडणूक हे डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे.
भाजपच्या राज्य कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक सातपूरमधील येथील हॉटेल डेमॉक्रेसी मध्ये झाली. त्यास केंद्रीय मंत्री, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. पक्षाचे आगामी धोरण काय असेल, याची स्पष्टता त्यांनी केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी अतिशय तडाखेबंद भाषण केले. विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांपेक्षा केंद्र आणि राज्य सरकारच्या विकास कामांची महती जनतेपर्यंत पोहचविण्याचे तसेच, विविध विकास प्रकल्पांमुळे सर्वसामान्यांना होत असलेला फायदा निदर्शनास आणून देण्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी फडणवीस म्हणाले की, राज्य सरकार आपला कार्यकाळ पूर्ण तर करेलच. आणि पुढच्या निवडणुकीत पुन्हा दीडपट अधिक जागा घेऊन निवडून येणार. महाविकास आघाडीने भ्रष्टाचाराची टी-ट्वेंटी खेळली, आपली सेवेची टी-ट्वेंटी आहे. 2014 नंतर आपल्याला जिंकायची सवय लागली आणि पत्रकारांना सुद्धा आपल्याला जिंकताना पाहण्याची सवय लागली आहे. पण एक सुद्धा पराभव झाला तर, हा आत्मचिंतन करण्याचा विषय आहे. अमरावतीमध्ये 3000 मतांनी पराभूत झालो, पण 6000 आपली असलेली मते बाद झाली, यावर चिंतन करावेच लागेल. राज्यात आपण 200 जागा देखील आम्ही निवडून आणू. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे शक्तिशाली नेते असले तरी ते संघटनशरण आहेत. नेते होताना आपल्यातील कार्यकर्ता मरू देऊ नका. महाविजय अभियानात आता थांबायचे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
बघा, देवेंद्र फडणवीस यांचे संपूर्ण भाषण
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1624393445468160000?s=20&t=6-U8joNzZm5N3co4Jx2FPw
BJP State Party Meeting Announcement New Campaign Politics