इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेले वादग्रस्त विधान ताजे असतानाच आता भाजप प्रवक्ता बरळला आहे. भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी पाचवेळा पत्र लिहून औरंगजेबाची माफी मागितली होती. त्यांच्या या विधानाचे मोठे पडसाद उमटत आहेत.
सध्या महाराष्ट्र राजकारणात विकास आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न बाजूला राहिले आहेत. किंबहुना कोणतीही प्रश्न आता शिल्लक नाहीत, असे वाटावे इतकी भयानक परिस्थिती सध्या दिसून येत आहे. कारण या प्रश्नावर कोणीही बोलण्यास तयार नाही. या उलट वादग्रस्त विधाने करून एकमेकावर आरोप प्रत्यारोप आणि चिखल फेक सुरू आहे. कोणीही उठतो आणि एका मागोमाग एक आरोप करीत सुटतो, त्यानंतर त्या आरोपावरून मोठा गदारोळ होता, असे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे.
राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तवामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. विनायक दामोदर सावरकर यांनी इंग्रज सरकारला पत्र लिहून त्यांची माफी मागितली होती, असे राहुल गांधींनी चिठ्ठी दाखवत म्हटले होते. यानंतर आता भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी विधान केले आहे, की छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची ५ वेळा माफी मागितली होती. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा राजकारण तापताना दिसत आहे.
महत्वाचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज इतिहास आणि वादग्रस्त वक्तव्य यामुळे महाराष्ट्राचे राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानानंतर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आता आणखी एका विधानाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्त सुधांशू त्रिवेदी यांनी शिवरायांबद्दल केलेले विधान सध्या चर्चेत आहे. आधीच राहुल गांधी यांनी सावरकर यांच्या माफीनाम्यावरून आरोप केल्यानंतर राजकीय वाद पेटला आहे. त्यात आगीत तेल याप्रमाणे या संदर्भात प्रतिक्रिया देताना भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी एक वादग्रस्त दावा केला आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाचवेळा पत्र लिहून माफी मागितली होती. तसेच त्यावेळी अनेकजण राजकीय समस्यांतून बाहेर येण्यासाठी माफीनामा लिहित होते, असेही त्रिवेदी यांनी म्हटले आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला असून शिवाजी महाराजांनी असे म्हणणारा ठार वेडाच असू शकतो, असेही आव्हाड म्हणाले.
रोहित पवार यांनीही ट्विट करत सुधांशू त्रिवेदी यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, छत्रपती शिवाजी महाराजांवर आता आणखी हा भाजपचा जंतू दिल्लीत वळवळला. आपल्या दैवतांवर एकेकाने चिखलफेक करून दुसऱ्या कुणाचे प्रतिमासंवर्धन करण्याचा तर हा डाव नाही ना? आता डोक्यावरून पाणी चाललंय.त्यामुळं डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचे ‘पाणी पाजण्याची’ वेळ आली आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्या मुळे संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. वास्तविक सुधांशू त्रिवेदी यांचे हे जुनेच विधान आहे. आजतक या वृत्तवाहिनीच्या डिबेट शोमध्ये बोलताना त्यांनी हे विधान केले असून याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडिया प्रचंड चर्चेत आहे. त्रिवेदी यांच्या या विधानावर जोरदार टीका होते. सुधांशू त्रिवेदींनी शिवरायांचा अपमान केला. त्याच भाजपच्या मांडीला मांडी लावून तुम्ही सत्तेत बसता. सतत स्वाभिमानाची भाषा बोलणारे शिंदे आता गप्प का? शिवरायांचा अपमान तुम्ही सहन कसा काय करू शकता?, असे संजय राऊत म्हणाले.
याआधी राज्यपालांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या एका विधानामुळेही राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली होती. ‘ छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते. तर नितीन गडकरी हे सध्याचे आदर्श आहेत’, असे राज्यपालांनी म्हटले होते. त्यात पुन्हा आता नव्यावादाची भर पडल्याने प्रकरण आणखीच गंभीर बनले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांवर आता #SudhanshuTrivedi हा भाजपचा जंतू दिल्लीत वळवळला.
आपल्या दैवतांवर एकेकाने चिखलफेक करून दुसऱ्या कुणाचं प्रतिमासंवर्धन करण्याचा तर हा डाव नाही ना?पण आता डोक्यावरून पाणी चाललंय.
त्यामुळं डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचं 'पाणी पाजण्याची' वेळ आलीय. pic.twitter.com/ilfAYBGh0o— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 20, 2022
BJP Spokesperson Chhatrapati Shivaji Maharaj Statement