मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांचा महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेत मोठा वाटा होता. ते एक हाती लढले. त्यांच्यावर टिकाही झाली, पण केंद्र आणि राज्यातील भाजपविरोधात त्यांनी अभियान सुरू ठेवले. आता सत्ता गेल्यानंतरही त्यांनी आपली मोहीम थांबविलेली नाही. संपूर्ण भाजपचा एकतर्फी कारभार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आता त्यांनी भाजप आमदाराच्या साखर कारखाना घोटाळ््याकडे संजय राऊत यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.
किरीट सोमय्या यांच्याकडे दौंडमधील भीमा साखर कारखान्यातील घोटाळ्याचे प्रकरण चार वेळा पाठविले. पण, त्यांनी तक्रार करण्यास नकार देत महाविकास आघाडीविरुद्धचे प्रकरण असेल तर मला सांगा, मी ते ईडीपर्यंत घेऊन जाईल असे, तेथील शेतकऱ्यांना स्पष्टपणे म्हटले. यावरून महाराष्ट्र आणि संपूर्ण देशभरात एकतर्फी कारभार सुरू असल्याचे स्पष्ट होते. जे भाजपबरोबर आहेत त्यांना अभय देण्यात येत आहे. तर विरोधकांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात येत आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
माझ्याकडे १७ कारखान्यांतील घोटाळ्यांची प्रकरणे आहेत. त्यापैकी हे पहिले प्रकरण आहे. भीमा साखर कारखान्याचे प्रकरण मी किरीट सोमय्या यांच्याकडे चार वेळा पाठवले होते. दौंडचे शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते चार वेळा हे प्रकरण त्यांच्याकडे घेऊन गेले. पण त्यांनी याची तक्रार करण्यास नकार दिला. भीमा साखर कारखान्यातील घोटाळ्याचे दोन हजार पानाचे पुरावे आज देवेंद्र फडणवीस यांना मिळतील. पण तरीही मी त्यांना पत्र लिहित ब्रीफ केलं आहे. भविष्यात अशी १७ ते १८ साखर कारखान्याची प्रकरणं मी देवेंद्र फडणवीस यांना पाठवणार आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
भाजपला जागा दाखविणार
अलीकडेच महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईत बैठक झाली. यामध्ये आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुका एकत्र लढविण्याचा निर्णय झाला. याची माहिती संजय राऊत यांनीच माध्यमांना दिली. यावेळी त्यांनी भाजपला त्यांची जागा दाखविण्यासाठी महाविकास आघाडीने दंड थोपटले असल्याचेही जाहीरपणे सांगितले.
BJP MLA Sugar Factory Scam Sanjay Raut ED Enquiry