मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय चलनी नोटांवर भगवान गणेश आणि लक्ष्मीची छायाचित्रे प्रकाशित करण्याचे आवाहन केंद्र सरकारला केले. या आवाहनावर राजकीय चर्चा सुरु असतांना भाजप नेते नितेश राणे यांनी भारतीय चलनावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असावा अशी मागणी केली. तर भाजप आमदार राम कदम यांनी चलनी नोटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र असलेल्या नोटा सोशल मीडियावर प्रकाशित करुन त्या ट्विटरवर पोस्ट केल्या आहे. त्यात त्यांनी अखंड भारत.. नया भारत.. महान भारत.. जय श्रीराम .. जय मातादी ! असे म्हटले आहे…..
https://twitter.com/ramkadam/status/1585506080515190784?s=20&t=DPjEUIz7Z2YlBj7VZPhvuw