रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

‘छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला’ या वक्तव्यानंतर अखेर भाजप आमदार प्रसाद लाड यांचा माफीनामा

डिसेंबर 4, 2022 | 9:03 pm
in राज्य
0
FjIyJVqaEAAiVPV

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सातत्याने वादग्रस्त विधाने करण्यात येत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य केली होती. या वक्तव्यांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेलं असताना, आता भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांचेही शिवाजी महाराजांबाबतचे असे एक वेळेच आश्चर्यकारक आणि अज्ञानी विधान समोर आल्याने, नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

इतकेच नव्हे तर तसा वाद देखील सुरू झाला आहे, दि. ३ नोव्हेंबर रोजी मुंबईत कोकण महोत्सव पार पडला. या महोत्सवात बोलताना प्रसाद लाड म्हणाले की, स्वराज्य भूमी कोकण महोत्सव कशासाठी हे तुम्ही विचाराल, हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा कोकणात झाला. यानंतर रायगडावर त्यांचे बालपण गेले. रायगडावर स्वराज्याची शपथ घेतली, असे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. त्यानंतर या आमदार प्रसाद लाड यांच्या चुकीच्या व वक्तव्याचा म्हटल्याचा एक व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेअर करण्यात आला आहे. यावरून आता भाजपावर जोरदार टीका सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पत्रकारांना प्रतिक्रिया देताना शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

खासदार राऊत म्हणाले की, छत्रपती शिवरायांचा जन्म कोठे झाला हा नवा वाद आज भाजपा उपटसुंभानी उकरून काढला. हे सर्व ठरवून चाललेय का? औरंगजेब किंवा अफजल खानाने सुपारी दिल्या प्रमाणे हे सत्ताधारी शिवरायांवर बदनामीचे रोज घाव घालीत आहेत. शिवरायांचा जन्म महाराष्ट्रातच झाला हे तरी या उपटसूंभाना मान्य आहे काय? असा सवालही संजय राऊतांनी भाजपाला केला आहे. तसेच इतका करारा जबाब मिलेगा! असे म्हणत इशाराही त्यांनी दिलाही आहे. त्यानंतर यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसाद लाड यांना लक्ष्य करत भाजपावर टीका केली. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या, असा सल्ला राष्ट्रवादीने दिला. तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. आता माफी मागून चालणार नाही. तर भाजपाने आता रगडून प्रायश्चित्त केले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

https://twitter.com/NCPspeaks/status/1599255784327909376?s=20&t=V7J0dwMogVXcf7WWKa-Jnw

तर दुसरीकडे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीदेखील लाड यांच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. लाड यांनी केलेले विधान बेजबाबदारपणाचे आहे. त्यांनी या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे. लाड यांच्या पक्षप्रमुखांनी त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे. ते जमत नसेल तर त्यांना महाराष्ट्रातून काढून टाकले पाहिजे, असेही संभाजीराजे म्हणाले.

दरम्यान, या वक्तव्याबरोबर प्रसाद लाड यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस राजकारण करण्याचा प्रयत्न करते, त्याचा मी निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी आणि स्वराज्याची स्थापना कोकणातून झाली. तर, शिवरायांचा जन्म कोकणात झाला, असे अनावधाने माझ्याकडून बोलले गेले. मात्र, माझ्या बाजूला बसलेल्या संजय यादव यांनी माझी चूक सुधारत शिवनेरीवर जन्म झाला सुधारत सांगितले. माझ्या शब्दामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असे लाड यांनी स्पष्ट केले. परंतु तरी हा वाद येथेच मिटेल असे वाटत नाही. त्यामुळे यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांवर कोणी काहीही बोलण्यापूर्वी विचार करावा, असे आदेशच काढण्याची सरकारवर वेळ येते की, काय असे म्हटले जात आहे.

https://twitter.com/IYCMaha/status/1599296174774943744?s=20&t=V7J0dwMogVXcf7WWKa-Jnw

BJP MLA Prasad Lad Controversial Statement on Shivaji Maharaj

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक शहराच्या चारही प्रवेशद्वारावर होणार ट्रक टर्मिनल; अंबड व सिन्नर औद्योगिक वसाहतीतील टर्मिनलचा निर्णय पंधरा दिवसात

Next Post

गुलाबराव पाटील म्हणाले, “मंत्रिपद गेले खड्ड्यात, शिवरायांचा अवमान केल्यास सोडणार नाही”; मित्रपक्ष भाजपला घरचा आहेर

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
Ndr dio News Gulabrao Patil 24 Nov 2022 12 scaled e1733059155240

गुलाबराव पाटील म्हणाले, "मंत्रिपद गेले खड्ड्यात, शिवरायांचा अवमान केल्यास सोडणार नाही"; मित्रपक्ष भाजपला घरचा आहेर

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011