विशेष प्रतिनिधी, मुंबई
१२ आमदारांच्या निलंबन प्रश्नी भाजपने आज विधिमंडळ कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या अखेरच्या दिवशी प्रारंभीच भाजप आमदारांनी विधिमंडळ सभागृहाच्या पायऱ्यांवरच प्रतिअधिवेशन सुरु केले आहे. या प्रतिधिवेशनाच्या अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणजेच एकाचवेळी दोन ्धिवेशन सुरू आहेत. सभागृहात खरे अधिवेशन तर पायऱ्यांवर प्रतिअधिवेशन. त्यामुळे ही बाब संपूर्ण राज्यात चर्चेची ठरत आहे. १२ सदस्यांच्या कारवाईच्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी भाजपने केली आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यपालांकडेही तक्रार करण्यात आली आहे.
या प्रतिअधिवेशनाच्या सर्व घडामोडी बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा