पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित पडला आहे, अनेक प्रकारे मोर्चे निघाले. अनेक समित्या नेमल्या गेल्या, आयोग स्थापन झाले. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे या संदर्भात पाठपुरावा केला. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातही प्रकरण गेले. पण अद्यापही हा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागलेला नाही. याउलट अधून मधून त्याला काहीतरी फाटे फुटत असतात. काही दिवसांपूर्वीच मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आणि छत्रपती संभाजी राजे यांच्यात वाद झाल्याची उलट सुलट चर्चा सुरू होती. हे प्रकरण मिटत नाही तोच आता एका ऑडिओ क्लिपमुळे पुन्हा एकदा मराठी क्रांती मोर्चा चर्चेत आला आहे.
मराठा क्रांती मोर्चा प्रश्न देखील अशीच एक अर्धवट माहिती वर आधारित क्लिप फिरत आहे, यात दोन व्यक्तींचे संभाषण सुरू असून त्या मध्ये मराठा क्रांती मोर्चा फुट, मराठा आरक्षण, पैशाची देवाण-घेवाण या विषयावर दोन जण बोलत असून चंद्रकांत पाटील यांचा देखील उल्लेख आलेला आहे, तसेच परळी बैठक वगैरे वगैरे. असा काहीतरी उल्लेख दोन जण करत आहेत. पण हे नेमके काय प्रकरण आहे, यातून काही स्पष्ट होत नाही.
या संदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, सदर क्लिप ही नेमकी काय आहे ? हे मला माहित नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकार सोडविण्यासाठी आमचे सरकार प्रयत्न करीत आहे. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे, त्यामुळे फोडाफोडीचा प्रश्नच येत नाही, आणि ती क्लिप खरी नाही तो काहीतरी बनावट प्रकार असावा. त्यामुळे त्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, असे म्हणत त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या काही पदाधिकाऱ्यांनी चंद्रकांत दादा यांच्या बद्दल संशय व्यक्त केल्याचे समजते. मराठा क्रांती मोर्चाने हा मुद्दा लावून धरत चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षण समिती अध्यक्षपदा वरून हकालपट्टी करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक योगेश केदार यांनी केली आहे. चंद्रकांत दादा मराठा आहेत, याची काय व्हॅलेडिटी आहे? असा सवाल योगेश केदार यांनी केला आहे. त्या ऑडिओ क्लिपमधील माहिती समाजाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर गोष्ट आहे. असेही केदार यांनी म्हटले आहे.
BJP Minister Chandrakant Patil Audio Clip Viral Maratha Kranti Morcha